मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात घेतलेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हणाले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात असून शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या या मताशी ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या वाचकांनी सहमती दर्शवली आहे.

‘लोकसत्ता डॉट कॉम’ने राज ठाकरेंनी शरद पवारांबद्दल केलेल्या राजकीय जातीपातीच्या वक्तव्यासंदर्भात जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जातीपातीच्या राजकारणाला शऱद पवार जबाबदार असल्याचा राज ठाकरेंचा आरोप पटतो का? असा प्रश्न वाचकांना ट्विटर पोलच्या माध्यमातून विचारण्यात आला.

अधिक वाचा  elecation Breaking : ..... तिथं निवडणुका घ्या! मराठवाडा, विदर्भाचा मार्ग मोकळा?

या पोलवर ७६९७ वाचकांनी आपलं मत नोंदवलं. यावेळी तब्बल ७४.५ टक्के वाचकांनी राज ठाकरेंच्या मताशी आपण सहमत असल्याचं सांगितलं असून २३.१ टक्के वाचकांनी मात्र नकार दिला आह. तर २.४ टक्के वाचक तटस्थ राहिले आहेत.