मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. किरीट सोमय्यांच्या रडारवर आता ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आले असून, सोमय्यांनी ट्विट करत मुश्रीफ परिवार घोटाळ्याबाबत आणखी एक बॉम्ब फोडला आहे. काय म्हणाले किरीट सोमय्या?

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप
गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपही होताना दिस आहे, अशात भाजपचे किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत. दरम्यान सोमय्यांनी ट्विट करत हसन मुश्रीफ परिवारावर 158 कोटींचा घोटाळयाचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा  'सगळी प्रॉपर्टी विकली तरी...' वडीलांच्या आठवणीत वसंत मोरेंची भावूक पोस्ट

ट्विटमध्ये सोमय्या म्हणतात..

हसन मुश्रीफ परिवार १५८ कोटींचा घोटाळा..हसन मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध पोलिस एफआयआर FIR नोंदवण्यात येणार आहे, पोलीस चौकशी व कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. ED आणि आयकर विभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी यासाठी मी पाठपुरावा करत आहे. असं लिहलंय.

हसन मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केला
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन नुकताच दापोली दौरा केला होता. या दौऱ्यानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणात कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पुण्यात दंड थोपटल्याचेही दिसले. हसन मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केला असून हा पैसा 47 कंपन्यांमधून आला आहे. यामध्ये शेल कंपन्या देखील आहेत, असे देखील किरीट सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.