मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घोषणा केली की, ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावू. परंतु, हे स्पीकर लावण्यासाठी एकही बहुजन जाता कामा नये. घोषणा तूम्ही करणार आणि बहुजन कार्यकर्ता त्यात भरडला जाणार. माझी राज ठाकरे यांना विनंती आहे, ते स्पीकर लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा आणि आधी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर पोलिसांना माहित आहे की पकडायचं कुणाला आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी लगावला आहे.

अधिक वाचा  कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडली; ७ दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर यांनी कडाडून टीका केली आहे. सुजात आंबेडकर यांनी यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. परंतु, त्याठिकणी कार शेड बांधण्याचे नियोजन शिवसेनेचेच होते. याशिवाय कारशेड येथे आंदोलन करणाऱ्या मुलांवरील गुन्हे मागे घेऊ असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. परंतु, अद्याप तसे झाले नाही. या मुलांवर गुन्हे दाखल असल्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना पासपोर्ट मिळत नाही.”

सुजात आंबेडकर काय म्हणाले?

अधिक वाचा  धक्कादायक ! पल्लवी डेच्या आत्महत्येनंतर आणखी एका २१ वर्षीय अभिनेत्रीचा राहत्या घरीच आढळला मृतदेह

काल कुणीतरी एक वक्तव्य केलंलं.. की जर मोठे भोंगे लावले मस्जिदीवर तर मी पोरांना हनुमान चालीसा तिकडे जाऊन म्हणायला लावेन.. माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे… फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे..जी कुणी जात आहेत तिकडे हनुमान चालीसा म्हणायला.. त्यांनी टीशर्ट काढून जानवं दाखवा आतमध्ये.. मग हनुमान चालीसा म्हणा.. एक बहुजन माणूस नकोय मला…
राज साहेबांना ही कळकळीची विनंती.. तुम्ही शरद पवारांचा इंटरव्हू घ्या… तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा.. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, एवढी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र ऑथोरीटी, मुंबई ऑथोरीटी, महाराष्ट्र मुंबई पोलीस, या सगळ्यांना एवढं आव्हान देतो.. की तुमच्या सगळ्यांसमोर हे वक्तव्य केलंय त्यांनी!
जर दंगल झाली, तर तुम्हाला माहितीये कुणाला पकडायचं..