पुणे –करोनामुळे स्थगित केलेली बारामती आणि दौंड मार्गावरील ‘डेमू’ अर्थात डीझेल इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट आणि आता ‘मेमू’ अर्थात मेन इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेनच्या सेवेला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.अखेरीस 11 एप्रिलपासून दौंड, बारामती मार्गावर ‘डेमू’ आणि ‘मेमू’ धावणार आहेत.

करोनामुळे रेल्वेने अनेक एक्‍स्प्रेस, लोकल, डेमू, मेमूची सेवा स्थगित करून विशेष रेल्वे सोडण्यात येत होत्या. मात्र, मागील काही महिन्यांपासून लांब पल्ल्याच्या सेवा पूर्ववत झाल्या. मात्र डेमू, मेमू मात्र यार्डमध्येच होत्या. आता पुणे शहरात दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याचे वेळापत्रकदेखील रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत भाजपचा संघर्ष थांबणार नाही; फडणवीस

यासह कोल्हापूर मार्गावरील रेल्वे (11425,11426) देखील पूर्ववत होणार आहे. ही रेल्वे पुण्याहून सकाळी 10.50 वाजता सुटणार असून, कोल्हापूर येथे 7.30 वाजता पोहोचणार आहे. तर कोल्हापूर येथून सकाळी 5.30 वाजता रेल्वे सुटणार आहे.