पंचवटी : दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला तणाव, नैराश्य, एकांगीपणा यांच्यामुळे आजार जडतात. निरोगी राहण्यासाठी कायम आहार, विहार करावा तसेच मनुष्याने तणावपूर्ण जीवनशैली टाळल्यास आजारांवर सहज मात करणे शक्य असल्याचा सूर श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात आरोग्य परिसंवादात निघाला.

काळाराम मंदिरात झालेल्या आरोग्य परिसंवादात डॉ. समीर चंद्रात्रे, वैद्य विनय वेलणकर, डॉ. दीपाली निकम, डॉ. शैलेश बोदार्डे, डॉ. किशोर वाणी, डॉ. मनोज चोपडा, डॉ. शीतल मोकळ, अरुण एकबोटे यांनी सहभाग घेतला. यावेळी वैद्य डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. मधुमेह असणाऱ्या नागरिकांनी नियमित रक्त तपासणी करावी, असे डॉ. चंद्रात्रे यांनी सांगितले.

अधिक वाचा  २२१ जोडप्यांचे तडजोडीने फुलले संसार; स्वखुशीने १०४ विभक्त कुटुंब

…तर वैद्य वेलणकर यांनी दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्य विविध कारणांनी खचतो. आपण तणावपूर्ण जीवनशैली टाळली पाहिजे, तसे जीवन जगल्यास आजारांपासून दूर राहता येते. डॉ. वाणी यांनी कमी पाण्यामुळे किडनी मूतखड्यासारखे आजार जडतात. रोज चांगले पाणी पिणे गरजेचे असल्याचे सांगितले.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चोपडा यांनी हृदय रोग होण्यापूर्वी ॲसिडिटी, जळजळ, गॅस असे त्रास पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाले तर वेळेत उपचार करावे. हृदय रोगाचा झटका आल्यास तीन ते सहा तासांच्या आत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचावे. स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. त्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्यवेळी लसीकरण करून घेत धोका टाळावा, असे डॉ. निकम यांनी सांगितले.

अधिक वाचा  टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार; 21 मृत्युमुखी

कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बोदार्डे यांनी कॅन्सरविषयी माहिती सांगताना, कॅन्सर म्हणजे पेशींची अमर्याद वाढ होणे. मानवी शरीराच्या कोणत्याही अवयवास कॅन्सर होऊ शकतो. स्त्रियांना स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा, तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांना तोंडाचा कॅन्सर होतो. बालरोग तज्ज्ञ डॉ. मोकळ यांनी बालकांना सहा महिने आईचे दूधच द्यावे, मुलांच्या शारीरिक हालचाली अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यासाठी मैदानी खेळातही मुलांचा सहभाग असायला पाहिजे, असे सांगितले.