पुणेः- महाराष्ट्राच्या गुणवत्‍ता पुर्ण शिक्षणाच्या यादीत महर्षी कर्वे संस्थेचे योगदान आहे. गेली १२७ वर्षे शिक्षण संस्थेची वाटचाल अविरत चालू आहे. या बददल संस्थेचे अभिनंदन केले असे प्रतिपादन उदय सामंत , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी केले ते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या संलग्नित बी . सी . ए व बी . डिझाईन पदवी धारक मुलींचा वार्षिक दीक्षान्त समारंभ प्रसंगी बोलत होते. त्‍यांनी संस्थेला शासन दरबारी असलेल्या प्रलबिंत कामाबाबत मदत करु असे मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष रविंद्र देव, उपकार्याध्यक्ष विदया कुलकर्णी, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य जयंत इनामदार , प्रभाकर सोनपाटकी, दत्‍ताजी थोरात सचिव डॉ. पी. व्ही.एस. शास्त्री , कॉलेजचे प्राचार्या मंजू हुंडेकर, स्वाती सायनकर, समिक्षा निकम, स्नेहा कोतवडेकर उपस्थित होते.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांच्या अजब अटी; राजेंनी डोकेच खाजवले! अटी सुधारणेचा प्रस्ताव

संस्थेच्या वार्षिक दीक्षांत समारंभात सायली मोहिते, सातारा, भाग्यश्री दीवाकर, पुणे, अंजली वैती,पुणे या विद्यार्थिनींना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे, बी. सी.ए. महाविदयालय पुणे, रत्‍नागिरी , सातारा व वाई अशा एकूण ६५० विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली.

एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा . उज्वला चक्रदेव यांनी आपल्या भाषणात मुलींना उच्य शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि कोणत्याही यशासाठी शॉर्टकट नसतो हे आवर्जून आधोरेकीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव यांनी करुन कोरोना काळातील संस्थेचे कार्य व संस्थेच्या भविष्यातील योजना याची माहिती दिली.

अधिक वाचा  गणेश कला क्रीडामध्ये महिलांसाठीच्या राखीव जागांची आरक्षण सोडत

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मल्लिका सामंत व आभार प्रदर्शन समिक्षा निकम यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक, देणगीदार, व्यवस्थापक मंडळाचे सभासद, सेवक वर्ग, विदयार्थिनी उपस्थित होते.