पुणे/सांगली : आता विधान परिषदेसाठी निवडणूक लागणार आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे व एका महिला सदस्याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी चा विश्वास चेहरा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मेधाताई कुलकर्णी यांना संधी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे.

आता विधान परिषदेसाठी विधानसभा सदस्यातून निवडणूक लागणार आहे. त्यात भाजपला संख्याबळानुसार ४ जागांवर संधी मिळेल. विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे व एका महिला सदस्याला संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहे. त्यात प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडचा त्याग करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांची नावे आघाडीवर आहेत.

अधिक वाचा  सांगली लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट; या गोष्टीची ‘सल’ असेल तर आजही माघारीस तयार: चंद्रहार पाटील

भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये कुलकर्णी यांचे काम उल्लेखनीय असतानाही पक्ष संघटनेचा विचार करून त्यांना विश्रांती देण्यात आली होती. परंतु पक्षाचा निर्णय आणि पक्षनिष्ठा याला शिरोधार्य मानत मेधा कुलकर्णी यांनी पक्षाच्या कामांमध्ये धन्यता मानत गेली तीन वर्ष राष्ट्रीय पातळीवर काम करत पक्षाला न्याय देण्याचे काम केले आहे. मेधा कुलकर्णी यांनी नुकतेच आंध्र प्रदेश भाजपच्या कार्यकारणी वरती महत्त्वाचे काम केले असून त्यांच्याकडे निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली त्या पदाला न्याय देत त्यांनी संघटनात्मक बदल करण्याचे काम केले असून उत्तर प्रदेशचे निवडणुकांमध्ये आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे.

अधिक वाचा  महायुतीत ८ जागांवर तिढा, भाजप नेतृत्वाला डोकेदुखी; पूनम महाजनांची उमेदवारीही येथे रखडली?

हे ही वाचा:

धन्य भाग सेवा का अवसर पाया.. म्हणत मेधा कुलकर्णी यांचा ‘राजप्रवास’ पुन्हा सुरु!

धन्य भाग सेवा का अवसर पाया.. म्हणत मेधा कुलकर्णी यांचा ‘राजप्रवास’ पुन्हा सुरु!

 

सध्या सदाभाऊंना ‘थोडी विश्रांती’ देण्याचा विचार भाजपने केला असल्याचेही सांगितले जात आहे. त्यांनी ती मान्यही केल्याचे समजते. विधान परिषदेची पुढची निवडणूक दोन वर्षानंतरच होणार आहे. तोपर्यंत सदाभाऊंना प्रतिक्षा करावी लागेल किंवा घरच्या मैदानात एक तर लोकसभेला राजू शेट्टीं यांच्या विरोधात किंवा विधानसभेला जयंत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकावा लागेल. तूर्त सदाभाऊंनी भाजपने घेतलेल्या भूमिकेचा सन्मान करत विधान परिषद न लढवण्याचे ठरवले, असल्याचे संकेत दिले आहेत.

कोथरूड भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्याकडे मोठी जबाबदारी; माजी आमदारांचं ‘असंही’ पुनर्वसन

या काळात संघटना मजबूतीकरण, शेतकरी प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेण्यासह पुस्तकांचे लेखन पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपसोबत युती केल्यानंतर खोत यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्यांच्याकडे कृषी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांचे खटके उडाले होते. शेट्टींनी युती तोडली.

अधिक वाचा  सोलापूरच्या निकरीच्या लढाईत फडणवीसांनी पुन्हा दंड थोपटले; तुम्ही समर्थन कोणालाही द्या, तरी मते मोदींनाच!

मात्र, सदाभाऊ मंत्रीपदासह भाजपसोबतच राहिले. तो सहा वर्षांचा काळ संपला. ”विधान परिषदेची निवडणूक महिनाभरात लागेल. पक्षाचे जे काही धोरण असेल ते मान्य आहे. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी आतापर्यंत विधान परिषदेत लढा दिला. रस्त्यावरची लढाई कायम राहील, असे खोत यांनी सांगितले.