गेल्या काही दिवसात पुणे शहरांमध्ये शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालय व इतर येथे अनेक गंभीर स्वरुपाचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनीवरील अत्याचाराचे गुन्हें घडत आहेत. काही दिवसापुर्वी बाऊन्स्रने पालकांना मारहाण केली, शाळेमध्ये विद्यार्थीनीवर प्राणघातक हल्ला झाला आणि आज ११ वर्षाच्या विद्यार्थीनीवर शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचाराचा घडला. सुसंस्कृत पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था आम्हांस चिंताजनक वाटते. फ्री या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आली आहे.

जे कोणी दोषी असतील त्यांस तुम्ही तुमच्या पध्दतीने धडा शिकवणार यामध्ये तिळमात्र शंका नाही परंतु एक संघटना म्हणुन आम्हांस काही विद्यार्थी व पालक हिताच्या दृष्टीकोनातून या सुचना करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून मोठा दिलासा, कथित 840 कोटींच्या घोटाळ्याचा तपास बंद

१) नोंदणीकृत सुरक्षा एजन्सी येथे कार्यरत असलेले कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक करुन त्याची नोंद आपले पोलीस प्रशासनाकडे असावी..

२) पुणे शहर व जिल्हयातील सर्व शाळा महाविद्यालय वसतिगृह, खाजगी कोचिंग क्लासेस व अभ्यासिका इत्यादी ठिकाणी सुरक्षाविषयक कडक उपाययोजना करावी.

3) काका-ताई योजनेद्वारे अजून प्रबोधन करावे.

४) सुरक्षा कॅमेरेही उत्तम दर्जाचे असावेत.

५) पोलीसांमार्फत प्रत्येक शाळा महाविद्यालय, होस्टेल सुरक्षा ऑडिट करावे.

६) आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज, वसतिगृह आणि कोचिंग क्लासेस आहेत त्यांना सुरक्षा संदर्भात सुचना कराव्यात.

७) शाळेच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये उडाणटप्पु रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा.

अधिक वाचा  मराठा आंदोलनाचा फटका नको ‘आपली’ मते सकाळीच उरका! राज्यभर मंदिरात बैठका घ्या या ३६ संघटना सक्रिय

८) विद्यार्थीनीवर कुठलीही प्रसंग किंवा संकट ओढवल्यास तीला तात्काळ संपर्क करता यावा याकामी हेल्पलाईन नंबर जाहिर करुन तो प्रत्येक शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, व इतर या ठिकाणी दर्शनी भागात मोठया अक्षरात लावणे बंधनकारक करावे.