महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्यावतीने शुभ पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे पूजन करून शिवप्रतिमेची पालखी कोथरूडच्या संगम चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड गावठाण दरम्यान काढण्यात आली.

आळंदीहून वारकऱ्यांचे एक पथक या पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. टाळमृदुंगाच्या तालावर आणि फुगडी च्या ठेक्यावर वारकऱ्यांसह महिला भगिनींनी शिव पालखी समोर आनंदोत्सव साजरा केला. या पालखी सोहळ्यात महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे व सिनेअभिनेते रमेश परदेशी यांनी केले होते. सुरेखा होले सुप्रिया काळे स्नेहल शिंदे वृषाली धुमाळ या महिला पदाधिकाऱ्यांसमवेत सुधीर धावडे संजय काळे गणेश शिंदे श्रीकांत अमराळे रोहित मोकाटे धनंजय बलकवडे तुषार कंधारे शशांक अमराळे यांनी संयोजन केले होते.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या यादीमुळे आज महाविकास आघाडीतील एक नेता बनू शकतो बंडखोर