बलात्कार, खून, धार्मिक स्थळांवर हल्ला, दहशतवाद्यांशी संबंध अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ८१ जणांना एकाच दिवसात फाशी देण्यात आली आहे. सौदी अरेबियाने पहिल्यांदाच एकाचवेळी इतक्या लोकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

स्थानिक वृत्तसंस्था सौदी प्रेस एजन्सीने सांगितले की, शनिवारी सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने या सर्व लोकांना फाशी दिली. यापैकी अनेकांनी आयएसआयएस आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनेसोबत काम केले होते. तर इतर आरोपी जण खून आणि बलात्कारासारख्या घटनांमध्ये सामील होते.

सौदीच्या अधिकृत वृत्तसंस्थेने (एसपीए) म्हटले आहे की, सर्वजण एकापेक्षा अधिक गुन्ह्यांसाठी दोषी आढळले आहेत. त्यात इस्लामिक स्टेट ग्रुप किंवा अल-कायदा, येमेनच्या हुथी बंडखोर किंवा इतर दहशतवादी संघटना यांच्याशी संबंधित गुन्हेगारांचा समावेश आहे. शिक्षा सुनावले गेलेले लोक देशात हल्ल्याचा कट रचत होते. तसेच त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि सुरक्षा दलाच्या सदस्यांची हत्या करणाऱ्यांचाही समावेश होता, असेही एसपीएच्या निवेदनात म्हटले आहे.

अधिक वाचा  नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, तर पराभव करणार; बच्चू कडू यांचा कडाडून विरोध

सौदीतील रहिवाशांव्यतिरिक्त काही परदेशी नागरिकांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामध्ये येमेनचेही रहिवासी होते. धार्मिक स्थळे आणि सरकारी संस्थांना लक्ष्य करणे, सुरक्षा अधिकार्‍यांची हत्या, बॉम्ब पेरणे, अपहरण, छेडछाड आणि बलात्कार आणि शस्त्रास्त्रांची चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये ते सहभागी होते. याशिवाय देशात अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र तस्करांचाही यात सहभाग होता.

न्यायालयात खटला चालल्यानंतर या सर्व गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मंत्रालयाने सांगितले की, अपील न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या सर्वांना सुनावलेली फाशीची शिक्षा मंजूर केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, न्यायालयाने या सर्वांना फाशीची शिक्षा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दहशतवादाशी संबंधित विविध गुन्ह्यांसाठी एका दिवसात ८१ जणांना फाशीची शिक्षा दिली, जी गेल्या वर्षी एकूण मृत्युदंडाच्या शिक्षेपेक्षा जास्त आहे.

अधिक वाचा  ‘वैचारिक पुण्यात’ एक अनोखं एकीकरण; सुमारे 200 पत्रकार एकत्र चिंतन मंथन अन् नवी दिशाही ठरणारं

मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये येमेनी नागरिकाचा समावेश आहे. त्यांनी आयएसआयएस सोबत काम केले होते आणि एका सुरक्षा अधिकाऱ्याची हत्या केली होती. याशिवाय सौदीमध्ये राहणारे दोन लोक आयएसआयएसला पाठिंबा दिल्याप्रकरणी दोषी आढळले होते. या व्यक्तींनी दोन सुरक्षा अधिकाऱ्यांची हत्या केली होती आणि राजधानीत नागरिक आणि परदेशी लोकांना लक्ष्य करण्याचा कट रचला होता.

याशिवाय येमेनमध्ये राहणारे आणखी तीन लोक दोन सुरक्षा अधिकाऱ्यांची हत्या, दहशतवादी संघटनांशी संबंध आणि शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळले. एका सौदी नागरिकाचे अपहरण, अत्याचार, सुरक्षा अधिकाऱ्याची हत्या आणि दहशतवादी संघटना स्थापन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?

दोन सौदींच्या नागरिकांना त्यांच्या आईची हत्या, वडील आणि भावाच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. याशिवाय, अनेक सौदी आणि सीरियन नागरिकांना दहशतवादी संघटना तयार करणे, आयएसआयएसशी संबंध असणे आणि पोलीस ठाण्यांवर हल्ले करणे यासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.