आठ मार्च हा दिवस महिलाशक्तीचा गौरव दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. याच महिला दिनानिमित्त केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने नारी पुरस्कार दिले जातात. यंदा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २९ महिलांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यात राज्यातील दिव्यांग कथ्थकनर्तिका सायली आगवणे, महिला सर्पमित्र वनिता बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा समावेश आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या या २९ महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार. महाराष्ट्रातील नारी शक्ती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कथ्थक नर्तिका सायली आगवणे, महिला सर्पमित्र वनिता बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा  क्लासेनने ठोकल्या 80 धावा, तरी अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड का?

उद्योगक्षेत्रात स्वतःच्या पायावर उभं राहून ग्रामीण भागातील तब्बल ४ हजार महिलांना उद्योजक बनवणाऱ्या मराठवाड्यातील कमल कुंभार या एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे तर पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे या बुलडाणा येथील असुन त्यांचे कार्य सर्वांना प्रेरीत करते. कथ्थक नर्तिका सायली आगवणे यांचा संघर्षमय प्रवास हा तितकाच रोमांचक असुन अंगावर काटा आणणारा आहे. या तिन्ही पुरस्कार विजेत्यांचे महाराष्ट्रातीत सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.