आज पुणे महानगरपालिकेचा वापर भारतीय जनता पक्षाने आपला शक्तिप्रदर्शन करण्याचा अड्डा म्हणून केला परंतु यामध्ये आज शेकडो सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागले. कारण त्यांच्या राजकीय श्रेयवादासाठी सर्वसामान्य नागरिकांची हक्काची पुणे महानगरपालिका आज छावणीमध्ये कैद झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या संपर्क कार्यालयांमध्ये किंवा महापालिकेच्या सभागृहात त्यांनी सत्काराचे आयोजन केले असते तरीही कोणत्याही पक्षाने त्यास नकार दिला नसता; परंतु आपला बालहट्ट पूर्ण करण्यासाठी त्याच पायऱ्या आणि त्याचा पोकळ धमक्या यामुळे आज सर्वसामान्य नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत असल्याचा आरोप पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली ताई धुमाळ यांनी केला आहे.

अधिक वाचा  गळीत हंगामाला साडेचार महिनेच पूर्ण राज्यातील १२० कारखान्यांचा हंगाम बंद; अद्यापही ८७ ठिकाणी हंगाम सुरू

आज पुणे महानगरपालिकेमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरक्षा विभागाने पोलिसांच्या सहकार्याने कडक बंदोबस्त मध्ये सर्वसामान्य नागरिकांना पुणे महानगरपालिकेत प्रवेश दिला नाही. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांबरोबर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते महानगरपालिकेमध्ये फिरताना दिसत होते. दीपाली प्रदीप धुमाळ विरोधी पक्षनेत्या पुणे मनपा

दुपारी चार ते साडेचार च्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र येऊन नवीन इमारतीतील जुन्या इमारतीमध्ये जात असताना नागरिक व विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक यांची देखील पोलिसांनी अडवणूक केली, त्यामुळे नागरिकांचा व विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा आणला गेला आहे. सर्व प्रकार महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच पत्रकार बंधु यांच्या देखतच घडत होता.

अधिक वाचा  धंगेकरांना लोकसभेत मदत करु; ….पण ठाकरे गटानंही यासाठी ठोकला शड्डू; पुणे काँग्रेसभवन नेमकं काय घडलं

टॅक्स भरणारे सर्वसामान्य पुणेकर नागरिक तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरी गरीब योजनेसाठी महानगरपालिकेत पत्र घेण्यात येतात त्यांची देखील अडवणूक भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आल्यामुळे त्यांच्या सत्काराचा अट्टहास करणा-या सत्ताधारी भाजपमुळे झाली. ही बाब अत्यंत निंदनिय व पुणे शहराच्या लौकिकास लाजविणारी आहे.