कर्नाटकच्या उडुपीतल्या शाळा-कॉलेजमध्ये हिजाबचा वाद पेटलाय. इथल्या 6 मुस्लीम विद्यार्थिनींनी थेट कॉलेजमध्ये हिजाब वापरण्यास सुरूवात केलीय. इतर सगळे विद्यार्थी गणवेशात असताना या मुली मात्र हिजाब परिधान करून कॉलेजला येऊ लागल्या. याला विरोध झाल्यानंतर हा आपला घटनात्मक अधिकार असल्याचा त्यांनी दावा केलाय.

कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. बीड शहराच्या बशीर गंज चौकामध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. ‘पहिले हिजाब फिर किताब’ अशा आशयाचे पोस्टर्स याठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या पोस्टर्समुळे सध्या शहरामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. फारुखी लखमानी विद्यार्थी सेनेच्या वतीने हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हर किमती चीज परदे में होती है, Hijab is our Right असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

अधिक वाचा  अखेर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

काय आहे वाद?

कर्नाटकच्या उडुपीतल्या शाळा-कॉलेजमध्ये हिजाबचा वाद पेटलाय. इथल्या 6 मुस्लीम विद्यार्थिनींनी थेट कॉलेजमध्ये हिजाब वापरण्यास सुरूवात केलीय. इतर सगळे विद्यार्थी गणवेशात असताना या मुली मात्र हिजाब परिधान करून कॉलेजला येऊ लागल्या…याला विरोध झाल्यानंतर हा आपला घटनात्मक अधिकार असल्याचा त्यांनी दावा केलाय.

या कृतीला कॉलेजमधील हिंदुत्ववादी विद्यार्थी संघटनांनी विरोध केला. मात्र हे विद्यार्थी तेवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनीही गळ्यात भगवा स्कार्फ अडकवून कॉलेजमध्ये येण्यास सुरूवात केली. मात्र त्यामुळे या मुद्द्यावरून जोरदार राजकारण पेटलंय. उडुपीचे आमदार आणि राज्याच्या शाळा विकास समितीचे अध्यक्ष रघुपती भट यांनी हिजाबचा आग्रह म्हणजे राजकीय खेळी असल्याचा आरोप केलाय.

अधिक वाचा  ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार

अनेक कॉलेजेसमध्ये हिजाब विरुद्ध भगवा स्कार्फ असा वाद रंगतोय. एका कॉलेजमध्ये तर काही विद्यार्थी हत्यारं घेऊन आल्यानं खळबळ उडालीये. या घटनेमुळे पोलीस सतर्क झाले असतानाच सरकारनंही सर्व शाळांसाठी सूचना जारी केलीये. त्यामुळे अनेक कॉलेजेस तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या. शाळा-कॉलेजमध्ये गणवेशच परिधान करून यावं लागेल, असं सरकारनं स्पष्ट केलं असलं तरी दोन्ही बाजू आपपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

याचे पडसाद संसदेतही उमटले. केरळचे काँग्रेस खासदार टी एन प्रतापन यांनी शाळांमध्ये हिजाबची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे आता देशभरातच य़ावर राजकीय प्रतिक्रिया उमटतायत.