हडपसर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हडपसरमधील सुरक्षा फाउंडेशन च्या वतीने भव्य रांगोळी आणि डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जुना म्हाडा कॉलनी येथे विविध विषय घेऊन भव्य रांगोळी साकारण्यात आली. सुरक्षा फाऊंडेशनचे संस्थापक तथा भाजपा अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष इम्तियाजभाई मोमीन यांनी रांगोळीची पाहणी करून स्पर्धकांची प्रशंसा केली. यावेळी यादवजी हरणे, उद्धव शीलवंत, बाळासाहेब पारधे, मारुती शिंदे, भारत गायकवाड, माधुरी कन्हैया रेखा कांबळे, शीतल कांकवलु, लहू कांबळे, नागनाथ चांदणे, किशोर परमार, आप्पा डावरे, नितीन चंदनशिवे ,लक्ष्मण वडवराव ,नितीन निरवने, सुरेश वडवराव ,अकील शेख, अकबर सय्यद ,समीर शेख, स्वप्निल शिंदे, मणीष विश्वकरमा, आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  श्रीगोंद्यात काॅंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी दुभंगणार? राहुल जगताप यांच्या हाती सुत्रे

यावेळी मुली आणि महिलांनी प्रचंड उत्साह मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ पासून भारतीय संविधानाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक विषयाचे संदेश देणाऱ्या रांगोळी साकारल्या होत्या. रांगोळी स्पर्धेमध्ये अनुक्रमे पहिला क्रमांक पासून दहाव्या क्रमांकापर्यंत मनीषा डावरे, रोहिणी निरावणे, सुलाबाई काकडे, रिया मृदुंगे, ज्ञानेश्वरी वडवराव, लक्ष्मी जगतकर, प्रिया शिंदे, गौरी नाईक, ऋतुजा कॅट्रोलु, श्रद्धा कांबळे यांना बक्षीस देण्यात आली. त्याच प्रमाणे नवीन म्हाडा कॉलनी या ठिकाणी सुरक्षा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये मोठ्या गटात पहिला क्रमांक सलमान पिरजादे, आयशा शकील, रुकसार कन्याल, तर छोट्या गटात सुफियान दयाश, जोया हल्लाळ, बिलाल कळी यांचा बक्षीस देण्यात आले. रांगोळी स्पर्धा आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला आणि नागरिक आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.