वारजे: दुःखी दीन दुबळे आणि उपेक्षित या लोकांचे दुःख म्हणजेच आपल्या दुःख ही भावना मनात जागवत काम करत असताना मग वय आडवे येत नाही….. पद लागत नाही… कि कोणता मोठेपणाही राहत नाही. वारजे माळवाडी भागातील युवानेते भारतभूषण शरद बराटे यांचं या भागातील काम पाहिले की हे सर्व डोळ्यासमोर लख्खपणे प्रकाशमय होतं. भारतभूषण बराटे घरात राजकीय वारसा अन वडिलांचं (शरदआबा ) सामाजिक बांधिलकीचं अर्पित आयुष्य यामध्येच भारतभूषण बराटे यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सुरुवातीला राजकीय घरातील मुलगा (नव्या पिढीचे प्रतिनिधित्व) याच भावनेने परिसरातील सर्व राजकीय पुढारी आणि विश्लेषक पाहत होते. परंतु कामाची खरी ओळख हे कामाच सातत्य… सामाजिक बांधिलकी, जिव्हाळा आणि आपुलकी यातून जसं फुलत जातं तसं दोन वर्ष भारत भूषण बराटे यांचे केलेले विविधांगी कार्य पाहिले तर नव्या दमाचा सामाजिक बांधिलकीचा चेहरा असल्याची भावना या परिसरामध्ये उदयास येत आहे.

अधिक वाचा  ‘वैचारिक पुण्यात’ एक अनोखं एकीकरण; सुमारे 200 पत्रकार एकत्र चिंतन मंथन अन् नवी दिशाही ठरणारं

गेली अनेक वर्ष रखडलेला गोकुळनगर पठार-सहयोगनगर या १.५ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे काम सामाजिक कार्यकर्ते युवा नेते भारतभूषण शरद बराटे यांच्याकडून स्वखर्चाने सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच नगरसेवकांचे अनेक नारळ फुटल्याची चर्चा देखील ऐकण्यात आली, पण हा रस्ता काही पूर्ण होऊ शकला नाही. मनपा निवडणुकीच्या आधी हा रस्ता पूर्ण करून देण्याचा शब्द भारतभूषण शरद बराटे यांनी दिला होता, आणि आता हा रस्ता होत असल्याने या परिसरातील नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गोकुळनगर पठार- सहयोगनगर येथील १.५ किलोमीटरचा रस्ता होत नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर जीव मुठीत धरून लोकांना ये-जा करावे लागत होते. या भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी हा रस्ता करून देईल असे वचन भारतभूषण शरद बराटे यांनी दिले होते त्या वचनाची वचनपूर्ती त्यांनी केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  राजस्थान कोटामध्ये चाललंय काय? NEET मानसिक तणावात 3 महिन्यांत 8 विद्यार्थिनीने थेट जीवन संपवलं

आज रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक विशेष महिला वर्गाला आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत. काम सुरू होताच नागरिकांनी एकच जल्लोष केला. अनेक वर्षांची आमची समस्या सुटली. आता आमचे जीवन सुकर होईल अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या. या वरच्या भागाला रस्ता नसल्याने येथील तरुणांची लग्न ठरत नव्हती, ठरलेली लग्न मोडत होती. लहान मुले तसेच वृद्ध लोकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या भागामध्ये वीज व पाणी आले होते पण रस्त्याची सोय नव्हती.

ठराविक परिसरातच गाजावाजा करणे अमान्य….

“मला नुसती आश्वासनं देऊन जनतेला खेळवत ठेवणं कधीच आवडलं नाही. एखाद्या ठराविक परिसरातच विकासकामे करून त्याचा गाजावाजा करणे हे तर मला अजिबात मान्य नाही. म्हणूनच गेली २० वर्षांपासून रखडलेला गोकुळनगर पठार- सहयोगनगर येथील १.५ किलोमीटरचा रस्ता मी स्वखर्चाने करून देत आहे. हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा असेल आणि त्यावर जवळपास ३० पथदिवे देखील असतील, या रस्त्याला एकूण आत्तापर्यंत 65 लाख रुपये खर्च आला आहे. हा रस्ता सुशोभीकरणाचे कामही केले जाणार आहे”. भारतभूषण शरद बराटे – सामाजिक कार्यकर्ते.