अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गरळ ओकलच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पुणे तथा नगरसेवक श्री. किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल चांदणी चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व सामान्यत असलेली प्रतिमा आणि त्यांची पूर्ण उंची पाहता महाराष्ट्र प्रदेश नाना पटोले यांनी विनाकारण त्यांच्यावर टीका करणे हे त्यांचे बौद्धिक पातळीच्या बाहेरची गोष्ट असून रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसने असे बालिश धंदे बंद करावेत असे किरण दगडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  संजय काकडेंची पोस्ट; 100 नगरसेवकांचीही न्यारी गोष्ट चंद्रकांतदादांचा स्व-अनुभव पुण्याची उमेदवारी धोक्यात?

नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा यावेळी तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. नाना पटोले विरोधात नारे देण्यात आले. या आंदोलनास प्रदेश चिटणीस युवा मोर्चा श्री. गणेशजी वरपे, प्रभाग क्र. १० चे अध्यक्ष सागर कडू, स्वीकृत सभासद श्री. वैभवजी मुरकुटे, प्रदेशाध्यक्ष स्वच्छता भारत अभियान श्री. धनंजय दगडे पाटील, मुळशी तालुका भाजपाचे उपाध्यक्ष श्री. सुनीलभाऊ दगडे पाटील, श्री. राजेशजी मनगिरे, श्री. प्रदीप जोरी उपस्थित होते.