वारजे कर्वेनगर प्रभागात विविध प्रकारे खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम सोयी सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नगरसेविका यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणार आहे. आजपर्यंत नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी विविध खेळ व क्रीडा प्रकारांना सोयी सुविधा देण्याचे काम केले आहे. याच धर्तीवर आता नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांच्या माध्यमातून व त्यांच्या सहयादी विकासनिधीमधुन आम्ही भव्य मातीचे मैदान व क्रीडा संकुल सत्यात उतरवत असून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत या कामाचा भूमिपूजन करण्यात येणार आहे.

या मैदानामुळे स्थानिक खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध होणार असून त्यांच्यातील खेळाला नवऊर्जा मिळणार यात शंका नाही, त्यामुळे खेळाडू व नागरिकांमध्ये आनंद व उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन आयोजक स्वप्नील दुधाणे यांनी केले आहे.

अधिक वाचा  वडिलांनी माझ्यासाठी ती एक गोष्ट आजवर केली नाही; अमित ठाकरेंकडून खंत व्यक्त

कोविडचे सर्व नियम पाळुन सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे असेही स्वप्नील दुधाने उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सांगितले आहे.