सत्ता…. राजकारण…. आणि आरोप प्रत्यारोप हे दिवसेंदिवस घडतच राहतील परंतु समस्त मानव जातीचा विचार करत वन जतन करण्यासाठी, जोपासण्यासाठी आणि वनसृष्टीचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील लोकप्रतिनिधी अन् पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेत्या दीपाली ताई धुमाळ विशेष लक्ष देत असल्याचा अभिमानच ठरत असल्याचे मत राज्यसभा खासदार वंदनाताई चव्हाण व्यक्त काम केले. पुणे महानगर पालिका व वनविभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ३५ एकर जागेवरील विकसित होणाऱ्या संजीवन उद्यानातील संजीवन वन उद्यान मध्ये मुख्य प्रवेशद्वार व मियावाकी गार्डन चे भुमिपुजन वेळी त्या बोलत होत्या. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव खटके, प्रदीप(बाबा) धुमाळ वनविभागाचे प्रदीप संकपाळ तसेच डाॅ महेश ठाकुर व स्थानिक रहिवाशी यांच्या उपस्थितीत होते.

अधिक वाचा  गडकोट किल्ल्यांची नावे मंत्र्यांच्या बंगल्याला गैर नाही; मात्र संभाजी छत्रपती यांची निर्णयकी भूमिका

पुणे महापालिकेतील हद्दवाढ झाल्यानंतर सर्व नागरिकांचा विरोध पत्करतात पुणे शहरालगत जैवविविधता टिकवण्यासाठी मी काम करत असताना अनेक टीकेला सामोरे जावे लागले. त्या काळात पक्षातील अनेक पदाधिकारी माझ्या भूमिकेच्या बद्दल साशंक असतानाही पुणे शहराच्या विकासातही पर्यावरणाचे महत्त्व समतोल राहण्यासाठी मी आग्रही होते सुरुवातीला असणारा विरोध नंतर मावळत पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपालीताई धुमाळ यांनी केलेल्या या संजीवन उद्यानाची संकल्पना पाहिल्यानंतर अभिमानास्पद वाटत आहे. पुणे शहरातील विविध भागात कार्यक्रमामध्ये सहभागी होताना या वर्षातील कामाचा कायमत माझ्याकडून संदर्भ दिला जाईल असे आश्वासनही यावेळी खासदार वंदनाताई चव्हाण यांनी दिले.

अधिक वाचा  ‘आयपीएल’ प्रायोजकत्व : नेमका किती पैशाचा खेळ? 'DFL‘ ते TATA स्थित्यंतराचा हा वेध

वारजे भागातील नागरिकांना वाढत्या शहरीकरणाबरोबर अत्यावश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक प्रतिबद्ध असल्याचे मत प्रास्ताविकामध्ये विरोधी पक्षनेता दीपालीताई धुमाळ यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदिप उर्फ बाबा धुमाळ यांनी केले.