नांदेड: राज्यातील महाविकस आघाडी सरकारनं मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची नावं गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या किल्ल्याचं जतन व्हावं आणि किल्ल्याच्या नावांना उजाळा मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल मत व्यक्त केलं आहे. मंत्र्यांच्या बंगल्याला गडकोट किल्ल्यांची नावे देण्यात गैर नाही मात्र गड किल्ल्याच्या नावाप्रमाणे साजेशी वागणूक तिथे असायला हवी, अपेक्षा खासदार संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केलीय. ते नांदेडमध्ये बोलत होते. खासदार संभाजी छत्रपती एका समर्थकाच्या जीमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं.

अधिक वाचा  मांजाला ७० फुट उंचावर अडकलेल्या कबुतराची सुटका!

खासदार संभाजी छत्रपती नेमकं काय म्हणाले?

खासदार संभाजी छत्रपती एका जीमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकोट किल्ल्याचे नाव दिल्याप्रकरणी त्यांनी आपली भूमिका टीव्ही 9 मराठीजवळ व्यक्त केलीय. मंत्र्याच्या बंगल्याला गड किल्ल्याचे नाव देण्यात गैर काही नाही पण किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक तिथे असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

संभाजी छत्रपतींचा ट्रेडमिलवर व्यायाम

खासदार संभाजी छत्रपती यांनी नांदेडमध्ये एका जिममध्ये आल्यावर ट्रेडमिलवर चालण्याचा व्यायाम केला आहे. शुक्रवारी रात्री आपल्या समर्थकांच्या जिमच्या उदघाटनासाठी आल्यानंतर व्यायाम करण्याचा मोह खासदार संभाजी छत्रपती यांना आवरला नाही. यावेळी त्यांनी एका ट्रेडमिलवर चालून व्यायाम करत उपस्थितांना धक्काच दिलाय.

अधिक वाचा  प्रजासाक्तकदिनी देशात स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट

शिवप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर निर्णय

राज्य मंत्री मंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांचे नावं देण्यात येणार आहे. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतीम मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय.

आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नावं मिळणार आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या A6 बंगल्याला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड असं नाव देण्यात आलंय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याB2 बंगल्याला रत्नसिंधु नाव देण्यात आलंय.