पुणे महापालिका प्रभाग क्र. १० बावधन सर्वे नंबर २२ येथे २३ वर्गखोल्यांचे २ मुख्याध्यापक कार्यालय, २ शिक्षक स्टाफ रूम चे बांधकाम पूर्ण आहे. तसेच ४ हॉलचे देखील बांधकाम पूर्ण आहे. या शाळेचे मनसे अध्यक्ष राजसाहबांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले आहे. मनपाच्या धोकादायक इमारतीतील मुलांचे नवीन विकसित (उद्घाटन झालेल्या) इमारतीमध्ये शिक्षण सूरू करण्याची मागणी प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग, पुणे म.न.पा. मनसे उपविभाग अध्यक्ष रमेश उभे यांनी केली आहे. या शाळेवर बावधन भागातील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांचा हक्क असून स्थानिक नगरसेवकांचा बाल हट्ट पूर्ण करण्यासाठी जर शिक्षण मंडळाने संस्थेस सदरील शाळा वर्ग केल्यास शिक्षण विभागातील प्रशासकीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सुशांत भुजबळ, आकाश तापकिर, राहुल भिलारे, विराज डाकवे, किरण उभे यांच्यासह भागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर उद्घाटन प्रसंगी मनपा शाळा क. ८२ बी व १५३ बी चे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीत होते. इमारतीच्या १० वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण झालेले होते; पुणे मनपाच्या जागा लाटण्याचे स्वार्थी हेतूने स्थानिक नगरसेवकांनी या शाळा शिक्षण विभागाकडे वर्ग न करता रखडत ठेवल्याने आज शेकडो विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

अधिक वाचा  अल्लू अर्जुनने मोडले सगळे रेकॉर्ड, ‘पुष्पा 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

सध्या प्रशासकीय स्तरावरती शिक्षण समिती सदस्य आणि स्थानिक नगरसेवK  दोन्ही भारतीय जनता पक्षाचे असून यांच्या पातळीवर ही मोक्याची जागा संस्थेच्या नावाने लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या इमारतीत फक्त आणि फक्त सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील मुलांचाच हक्क असून भारतीय जनता पक्षाच्या या छुप्या कृतीला तेवढ्या तीव्र स्वरूपात विरोध केला जाणार आहे. या पुणे महापालिका आयुक्त मार्फत शिक्षण विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे नम्र विनंती करण्यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या इमारतीमधील मनपा शाळा स्थलांतर करायची यासाठी शिक्षण मंडळाकडून नवीन राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नवीन खोल्यांसाठी अंदाजे १०० बॅचेस देखील इमारतीला दिले आहेत ते आताही त्याच इमारतीत आहेत. परंतु खाजगी संस्थेच्या मार्फत विकास करण्याचे गाजर दाखवत स्थानिक नगरसेवक ही पुणे मनपा ची जागा लाटण्याची भीती निर्माण झाली असून हेतुतः सदर इमारतीत लाईट व पाणी सुविधा अपूर्ण आहेत. आजही भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक इमारतीचा ताबा अद्याप शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडे देत नाहीत.

अधिक वाचा  त्याशिवाय शिंदे दिल्लीकडे डोळे वटारण्याचं धाडस करणार नाहीत, खासदाराचा मोठा दावा

मौजे बावधन खुर्द गावठाण येथे मनपा शाळा क.८२ बी व १५३ बी अशा मराठी माध्यम (इ.५ वी ते ७ वी सेमी इंग्रजी) दोन शाळा एकाच इमारतीत भरत आहेत. सदर ठिकाणी जुने पूर्वीचे कच्चे बांधकाम असून छताला पत्रे असलेल्या ७ वर्गखोल्या आहेत. दोन्ही शाळेचे एकच ऑफिस व त्यातच संगणक कक्ष केला आहे. ही वर्गखोली व जिना अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. त्यावर १ वर्गखोली आहे. सदर वर्गखोल्या या अतिशय जुन्या मोडकळीस आलेल्या अतिशय लहान आकाराच्या व कमी प्रकाश व्यवस्था असलेल्या आहे. जुन्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसण्यास अतिशय गैरसीय आहे. सद्यस्थितीला सदर इमारतीचे बांधकाम अतिशय जुने असल्याने फरशीला मोठया फटी आहेत त्यामुळे वारंवार घुशी, साप निघतात. विद्यार्थी, शिक्षक यांच्या जिवितास धोका निर्माण झालेला आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री फडणवीसांनी उघडले पत्ते 5 वर्षाची रणनीती ठरली मित्रपक्षांसाठी ही एक अट अन् हे प्रतिनिधी नेमणार

मनपा शाळा क्रमांक ८२ बी चा बालवाडी ते ७ वी पर्यंत चा पट ३८९ तर मनपा शाळा क्रमांक १५३ बी चा पट ३२५ असा आहे. जीर्ण इमारतीची दोन्ही शाळांची ७१४ विद्यार्थी संख्या आहे. शाळेची गुणवत्ता देखील उत्तम आहे. केवळ विद्यार्थ्यांना बसण्यास जागा अपुरी असल्याने जास्त प्रवेश देता येत नाहीत. इमारत जुनी व जीर्ण तसेच अतिशय कमी जागेत असल्याने RTE act 2009 मधील निकषाप्रमाणे कोठी, ग्रंथालय, प्रयोग शाळा, किडांगण, सीमाभित प्रत्येक शाळेस स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय इ. कायदयाने विहित केलेले निकष पूर्ण होऊ शकत नाहीत.

शिक्षणाचा अधिनियम २००९ नुसार सद्यस्थितीतील ८२ बी व १५३ बी या मनपा शाळांचे स्थलांतर प्रभाग क्रमांक १० मौजे बावधन खुर्द स.नं.२२ येथील पुणे मनपाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या इमारतीत स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.