आळंदी : काव्यमित्र संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ,बाळशास्त्री जांभेकर,स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा.नामदेवराव धुमाळ,सामाजिक कार्यकर्ते राजेश भोईटे,प्रेरणादायी वक्ते लेखक राजेश दिवटे, काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांच्या हस्ते ” राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार ” झुंज संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांना प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार प्राप्त राजू हिरवे यांच्या नेतृत्वाखाली झुंज दिव्यांग संस्था ही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे, विशेषतः ही दिव्यांग बांधवांसाठी वेगळे उपक्रम राबवत असते, आतापर्यंत अनेक दिव्यांग वधू-वरांचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत.दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन योजना,त्यांच्या अडीअडचणी साठी संस्था नेहमी धावून जात असते,अनेक दिव्यांग बांधवांना संस्थेच्या वतीने व्यवसाय प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. भविष्यात संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी भव्य असे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचा मानस आहे. या सर्व कार्याची दखल घेत काव्यमित्र संस्थेच्या वतीने झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांना राष्ट्रीय युवा चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे असे काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी सांगितले.

अधिक वाचा  सहकार आयुक्तांची भाजपा सहकार आघाडी शिष्टमंडळाने घेतली भेट

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजक हरिनाथ कांबळे,संदीप कोम्पले, बिबीशन पोटरे यांनी केले.