कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२२” अन्वये पुणे शहराला देशात प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती प्रचार व प्रसार करून नागरिकांचा स्वच्छतेच्या संदर्भात विविध पातळीवर राबवण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमा पैकी चित्र रूपी थीम्स प्रत्यक्षात भिंतीवर साकार करण्यासाठी चित्रकला शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून या स्पर्धेमध्ये चित्रकलेमध्ये पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना व आर्टिस्ट कलाकारांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले. सदर ही स्पर्धा कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक १०, ११, १२ या तीनही प्रभागांमध्ये राबविण्यात आली. या स्पर्धेतील विषय क्रमांक १) माझी वसुंधरा अभियान २) सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज ३) स्वच्छता विषयक जनजागृती ४) कचरा वर्गीकरण करणे ५) प्लास्टिक बंदी करणे. ६) वॉटर प्लस व पर्यावरण जनजागृती करणे. ईत्यादी विषय स्पर्धकांना देण्यात आले होते. त्या विषयाला अनुसरून स्पर्धकांनी भिंतीवर अप्रतिम चित्रे रेखाटली.

अधिक वाचा  दिल्लीचं ठरलं! तुरुंगातूनच सरकार चालवणार, अरविंद केजरीवालांचा पहिला आदेश जारी

सदर स्पर्धा डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, श्रावणधारा वसाहत, मयूर कॉलनी, मोरे विद्यालय, रामबाग कॉलनी, आयडियल कॉलनी, नविन समाविष्ट बावधन, जुने बावधन, भुसारी कॉलनी, शिक्षक नगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर ईत्यादी भागात ही स्पर्धा आयोजित करून राबवण्यात आली. सदर स्पर्धेंचे आयोजन व नियोजन महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली स्पर्धा आयोजित करण्यात आली. वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे असे म्हणाले की,” या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील आर्टिस्ट कलाकारांनी व नागरिकांनी सहभागी होऊन चित्रकलेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  मराठा आंदोलनाचा फटका नको ‘आपली’ मते सकाळीच उरका! राज्यभर मंदिरात बैठका घ्या या ३६ संघटना सक्रिय

तसेच विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक रुपये २५०००/- द्वितीय क्रमांक रुपये १५०००/- तृतिय क्रमांक रुपने १००००/- रोख व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.” सदर चित्रे रेखाटण्यासाठी लागणारे अनेक प्रकारचे रंग, ब्रश, थिनर ईत्यादी लागणारे साहित्य महानगरपालिकेच्या खर्चातून पुरविण्यात आल्या. सदर स्पर्धे मध्ये तक्ष्य अनिमेशन अँन आर्ट स्कूलचे चित्रकलेचे प्रा. रोहित चव्हाण, के. पी. आर्ट स्टुडिओ पुणेचे प्रा. कमलेश पाटील, विद्यार्थी जय मैड, निकिता चव्हाण, चित्रकार रुपेश पंडीत, हेंमत साखरे ईत्यादी स्पर्धकांनी भाग घेतला. तसेच विशेषतः डहाणूकर कॉलनीतील आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे सेवक शरद वावळकर, मोटार सारथी अक्षय पेरला, जनवाणीचे समीर अजगेकर, जयश्री पाटील यांनी स्वतः देखील चित्रे चितारली. ही कलाकृती चितारत असताना रस्त्याने जाणार्‍या येणाऱ्या नागरिकांनी चित्रकलेचे कौतुक करून अभिनंदन केले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरिक्षक वैभव घटकांबळे, हनुमंत चाकणकर, गणेश साठे, शिवाजी गायकवाड, संतोष ताटकर, गणेश चोंधे, नवनाथ मोकाशी, रूपाली शेडगे, प्रमोद चव्हाण, सतीश बनसोडे मोकादम अशोक खुडे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, विजय पाटील, अशोक कांबळे, सुनिल भोसले ईत्यादीनी परिश्रम केले.