मुंबई :राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक  रोज चर्चेत असताता. आता त्यांनी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे  यांना टोले लगावले आहेत. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात 24 जागांची जबाबदारी घ्यावी आणि तिथल्या जागा निवडून आणाव्यात, मग आम्हाला कळेल की ते केंद्रीय मंत्री आहेत, असे खुले आव्हान राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी दिलं आहे. पैसा आणि ताकदीच्या जोरावर त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली, गल्लीत निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असं होत नाही, अशी खरमरीत टीका मलिक यांनी राणेंवर केली आहे. तसेच उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. शरद पवार यांनी म्हंटल होतं की भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं. आमची काँग्रेस सोबत अनेक ठिकाणी युती आहे, मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने लक्षात घ्यायला हवं आणि इतर पक्षासोबत यायला हवं. असेही ते म्हणाले आहेत.

अधिक वाचा  वडिलांच्या संपत्तीत मुलींचाही हक्क सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

जो पक्ष ज्या राज्यात मोठा आहे, त्यांच्या सोबत निवडणूक लढायची असं आमचं ठरलं आहे. शिवसेना 50 ते 100 जागा लढणार आहे, तो त्यांचा निर्णय आहे. मात्र आम्ही सपासोबत जाणार आहोत आमचं ठरलं आहे. अशी माहितीही मलिक यांनी दिली आहे. गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत दिलं नव्हतं. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे तिथं भाजपची सत्ता आली. त्यावेळी देखील जे राजकारण घडलं तेच आता पुन्हा एकदा गोव्यात होत आहे. आमची भूमिका आहे महाविकास आघडी प्रमाणे गोवा विकास आघाडी करावी. परंतु काँग्रेस सकारात्मक नाही. अपेक्षा आहे ते आमच्या सोबत गोव्यात येतील, असे स्पष्ट मलिक यांनी बोलून दाखवलं.

अधिक वाचा  तेव्हा राणेंना अटक केली, आता पटोलेंना का नाही? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

शरद पवारांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उत्तर प्रदेशमध्ये शरद पवार प्रचारासाठी यावा अशी मागणी केली, होत असल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच दुकानांवर सरसकट मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना इतर भाषेच्या पाट्या देखील लावण्याचा अधिकार आहे. मराठी सोबत गुजराती, उर्दू इंग्रजी पाट्या लावण्याचा मुभा आहे. अशी माहितीही त्यांनी दिली आहे. पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण पाहत आहात की सातत्याने उत्तर प्रदेश मध्ये अनेक घटना घडत आहेत. आत्ता पर्यत 7 आमदार 2 मत्र्यांनी राजीनामा दिला आहे. उद्या देखील एक मोठी घटना घडणार आहे. दलित मजदूर, शेतकरी यांच्यावर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून त्यांची हत्या करण्यात आली, त्यानंतर असे संकेत दिसू लागले होते की भाजप उत्तर प्रदेश मध्ये हरणार आहे, आता याचा परीणाम दिसू लागला आहे, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.