पुणे – राज्यात व शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे. या बदलत्या नियमामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार होता.

भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता

यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती. परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले.

अधिक वाचा  शाळा कधी सुरू होणार? राजेश टोपेंनी दिले संकेत

या महोत्सवाचे आयोजन आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे करण्यात आले होते शहरातील मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव संपन्न होणार होता. महोत्सव व्हा यासाठी आर्य संगीत प्रसारक मंडळाने महापौर मुरलीधर मोहळ यांची भेट घेत , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही याबाबत चर्चा केली होती.