इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत.दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. पण हा सण 15 जानेवारीलादेखील साजरा करण्यात येतो. पण असं फार क्वचित घडतं. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो.

खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते या दिवशी तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनण्यास सुरुवात झाली. मकर संक्रांत नक्की का साजरी करतात याबद्दल मकर संक्रांतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मकर संक्रांत म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.

अधिक वाचा  Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच

मकर संक्रांत सगळीकडे साजरी करण्यात येते पण मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला आहे का? मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे हे सध्याच्या मुलांच्या मकर संक्रांतीची व्याख्या आहे. मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधारणतः दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी येते. यापूर्वी 2016 या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येऊन गेली आहे. काही ठिकाणी हा सण पतंगांचा सण म्हणून ओळखला जातो मात्र त्यामागे असणारे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी सकाळी उन्हात उठून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि शिवाय शरीराला व्हिटामिन डीदेखील मिळते त्यामुळे पतंग उडवायची प्रथा पडली. मुंबई, गुजरात अशा राज्यांमध्ये  जास्त प्रमाणात संक्रांत साजरी करण्यात येते. आता याला अगदी मोठा फेस्टिव्हलचा लुक आलेला आहे.

अधिक वाचा  लशींच्या तुटवड्याचे दावे खोटे; 30 दिवसांपेक्षाही जास्त साठा - केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्त्व

मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण तुम्हालाही कधीतरी प्रश्न सुचला असेलच ना? की याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का मिळतात. बाकीच्या वेळी हवं असेल तरी मिळत नाहीत. तर त्यासाठीदेखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत साजरी करताना तिळगुळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.  तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, अशा स्त्रियांनाही तिळातील कॅल्शियममुळे बराच फायदा होतो. संधीवातावर तिळाच्या तेलाने मालिश केल्यास, संधीवाताच्या रूग्णांनाही बराच फरक पडतो. त्यामुळे अशा तिळामध्ये गूळ मिक्स करून तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टींचा फायदा होतो.

अधिक वाचा  गडकोट किल्ल्यांची नावे मंत्र्यांच्या बंगल्याला गैर नाही; मात्र संभाजी छत्रपती यांची निर्णयकी भूमिका