मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील तब्बल पाच हजार झाडांना क्यूआर कोड बसवण्यात आला असून त्याद्वारे झाडाचे नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी वा इतर वापर याचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे. विद्यापीठाच्या भूगोल आणि लाईफ सायन्स विभागाने पुढाकार घेऊन या झाडांची नोंद केली आहे. यासोबतच विद्यापीठाच्या आवारात आढळणारे पक्षी, कीटक यांच्याही नोंदी करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या भूगोल, लाईफ सायन्स आणि एनएसएस पदव्युत्तर विभाग यांच्या समन्वयाने ‘जैवविविधता अहवाल’ तयार करण्यात आला असून या अहवालाअंतर्गत विद्यापीठातील १० सेंटीमीटरपेक्षा अधिक आकाराचे खोड असलेल्या ५,३५७ झाडांची नोंद (जिओ टॅगिंग) करून त्यांना क्यूआर कोड बसविण्यात आले. त्याद्वारे विद्यापीठात हे झाड नेमके कुठे आहे याची माहिती मिळते. तसेच झाडाचे बोलीभाषेतील नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी आणि इतर उपयोग यांचे तपशील सहज उपलब्ध होतात. शिवाय झाडांची कार्बन ग्रहण करण्याची क्षमताही टिपण्यात आल्या आहेत. हे पाहण्यासाठी ‘लीव्ह ग्रीन’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या कामात सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे आणि राजदेव सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.

अधिक वाचा  मकर संक्रांत आणि तीळ गुळ यांचे महत्व

राजेंद्र शिंदे हे वनस्पतीशास्त्रज्ञ (बोटॅनिस्ट) आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ (टॅक्सनॉमिस्ट) आहेत. झाडांना लावण्यात आलेल्या ‘क्यूआर कोड’च्या छपाईसाठी विद्यार्थी विकास विभाग आणि केएलइ महाविद्यालयाने अर्थसहाय्य केले.  ‘या उपक्रमात माहिती संकलनासाठी चोवीस विद्यार्थ्यांनी परिश्रम केले. या प्रक्रियेत विद्यार्थीही निसर्ग साक्षर होताना दिसले. यूनेस्कोच्या ‘शाश्वत विकासासाठी शिक्षण’ या धोरणाचा अनुभव आम्हाला आला. यामध्ये लाईफ सायन्स विभागाच्या निशा शाह, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता अनुराधा यांचे महत्त्वाचे योगदान आहे,’ असे भूगोल विभागाच्या डॉ. अपर्णा फडके यांनी सांगितले.

 मोठय़ा संख्येने असलेली झाडे

नाव                    झाडांची संख्या

सोन मोहर                 ६८५

अधिक वाचा  पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार 'आप'कडून भगवंत मान केजरीवाल यांचा निर्णय

 आंबा                      ५५१

अशोक                    ३३९

नारळ                      ३१८

 कडूनिंब                    २९८

 आफ्रिकन टयूलिप            १८९

वर्षां वृक्ष                      १७१

 सुबाभाळ                   १४०

गुलमोहर                   १३१

विद्यापीठात आढळणारे काही पक्षी

हळदी कुंकू बदक, काळा शिशिर, मोर शराटी, ढोकरी, पाच प्रकारचे बगळे, घार, दलदली भोवत्या, शिक्रा, जांभळी पानकोंबडी, टिटवी, चिखल्या, कांस्यपंखी कमळपक्षी, चिखली तुतारी, पोपट, पर्वाण, कोकीळ, भारद्वाज. गव्हणी घुबड, धीवर,तांबट, खाटीक, नवरंग. नाचण, भिंगरी, बुलबुल, साळुंकी, मैना, दयाळ, कस्तुर, पाणकावळा.