आळंदी : उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका” असा महामंत्र देणारे स्वामी विवेकानंद व स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी जीवन जगणे अपेक्षित आहे,आजच्या समाजात संस्काराची आणि राष्ट्र प्रेमाची रूजवणूक करण्यासाठी शिवबा पाहिजे असेल तर पहिल्यांदा जिजाऊ घडली पाहिजे असे प्रतिपादन डाॅ.सुनिल वाघमारे यांनी आळंदी येथे व्यक्त केले.आळंदी येथील इंद्रायणी सेवा फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने आळंदी येथील कार्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल शिंदे होते.यावेळी कार्याध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज हिंगनकर, पंकज काळजे, सिताराम झेंडे, अप्पा सोनवणे, चेतन पावडे उपस्थित होते.

अधिक वाचा  देहूच्या पहिल्या निवडणुकीत आमदार सुनिल शेळके यांची एकहाती सत्ता !

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डाॅ.वाघमारे म्हणाले ,”स्वामी विवेकानंदांची जयंती देशभरामध्ये ‘युवक दिन’ म्हणून साजरी केली जाते.देशाला महासत्ता बनविण्यासाठी देशातील तरुणाने शिकले पाहिजे असे मत स्वामी विवेकानंद यांनी मांडले होते, ते आजही तितकेच खरे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी वाटचाल करणे गरजेचे आहे.