मुंबई: वरळीतील कोविड सेंटरचं काम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला दिला आहे ,असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी तयार केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना किरीट सोमय्या यांनी यावरुन जाहीर आव्हान दिलं असून मुंबईतील १० कोविड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावे असे म्हटले आहे. दरम्यान हे प्रकरण किरीट सोमय्या यांनी उचलून धरलं असून ट्वीट करत शिवसेना नेत्यांना इशारा दिला आहे. किरीट सोमय्यांनी ट्वीट करत काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, व्यवहाराचे पुरावे मी प्रस्तुत करणार असल्याचा इशारा शिवसेना नेत्यांना दिला आहे.

अधिक वाचा  Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच

ट्वीटमध्ये काय म्हटले आहे –
“COVID की कमाई” शिवसेना मुंबई महापौर किशोरी पेडणेकर…. यांचा किश कॉर्पोरेट इंडिया कंपनीला मुंबई महानगरपालिकेचा वरळी विभागाने कोविड केंद्र/कार्यासाठी 1.97 कोटींचे ऑर्डर्स/पेमेंट केले (यादी, पुरावे सोबत देत आहे) काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, पेमेंट चे पुरावे मी प्रस्तुत करणार असा पुनरुच्चार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान
मुंबईतील १० कोविड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावं असं आव्हान किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. ते म्हणाले होते की,मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की, हिंमत असेल तर मुंबईतील सहा कोविंड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात महापौरांच्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट मिळाले  आणि हे अपारदर्शक पद्धतीने दिले आहे.उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणाऱ्यालाही अशाच पद्धतीने कोविड सेंटरचं कंत्राट मिळाले आहे.त्याची कागदपत्रं जनतेसमोर ठेवणार आहे असा इशारा यावेळी त्यांनी दिला होता.

अधिक वाचा  आबांचा मुलगाही पॉवरफुल ,कवठे महाकाळ ताब्यात

“ठाकरे सरकारसाठी कोविड हे कमाईचं साधन”
शिवसेना नेत्यांना आणि ठाकरे सरकारसाठी कोविड हे कमाईचं साधन आहे आणि म्हणूनच रोज सकाळ-संध्याकाळ लॉकडाउनबद्दल बोलत असतात. दहिसरचं केंद्र सुरु झालं, १ जानेवारीपासून ५०० बेड्सची ऑर्डर दिली, पण एकही रुग्ण दाखल नाही. किशोरी पेडणेकरांनी किरीट सोमय्याला गांजेबाज, नशेबाज सांगा पण तुमच्या सत्तेच्या घोटाळ्याचा नाद राज्यातील जनता उतरवणार,” असं किरीट सोमय्या म्हणाले होते.