खास रे संगीत आणि लेट्सअप मराठीच्या संयुक्त विद्यमाने बोचऱ्या थंडीत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना येड लावण्यासाठी ‘बेक्कार थंडी’ हे खास विंटर अँथम सॉंग लाँच करण्यात आले आहे. अवघ्या महाराष्ट्रात अँथम सॉंग प्रदर्शित होताच या गाण्याची ‘हवा’ झाली असून खास रे च्या यंग ब्रिगेडने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केलं आहे.

खास रे संगीतचे नवीन गाणे लाँच
नेहमीच आपल्या वेगळ्या प्रयोगांसाठी प्रसिद्ध असण्याऱ्या ‘खास रे’ च्या शिलेदारांनी यंदाही आपला गावरान ठसका जपला असून थंडीचं हे प्रचंड वेड लावणारे गाणे प्रेक्षकांसमोर आणले आहे. या व्हिडिओ गाण्याचे संतोष शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. तर हे गाणे संजय श्रीधर यांनी लिहिले असून त्यांनीच हे गाणे गायले आहे. तर संदेश कालेकर यांनी हे गाणे संगीतबद्ध केलं आहे.

अधिक वाचा  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन

पुण्यातील एका छोट्याशा गावामध्ये शूटींग
एका रात्रीत पुण्यातील बोपगावमध्ये बोचणाऱ्या थंडीत या गाण्याचे शूटींग पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावातील ग्रामस्थांना या थंडीच्या अँथम सॉंगमध्ये अभिनय करण्याची संधी देण्यात आली आहे . नरेंद्रकुमार फिरोदीया यांनी ह्या गाण्याची निर्मिती केली असून चालू घडामोडींवर मनोरंजनात्मक पद्धतीने भाष्य करण्याचा प्रयत्न ‘खास रे’च्या माध्यमातून आपण सातत्याने करत असल्याचे त्यांनी म्हंटल आहे ..सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पारा घसरलाय. विशेष म्हणजे यंदा मुंबईमधेही प्रचंड थंडी आहे. त्यामुळेच थंडीवरील हे अँथम सॉंग करण्याचे ठरल्याचे नरेंद्र कुमार फिरोदिया यांनी सांगितले.