मुंबई, दि. १२ :- स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. तसेच जयंती निमित्त साजऱ्या करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय युवक दिनाच्या विविध उपक्रम, कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे की, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विद्वत्तेतून जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. विश्वकल्याण आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांबाबत त्यांनी परखडपणे मांडणी केली. युवाशक्तीसाठी स्वामीजींचे जीवन आणि विचार आजही मार्गदर्शक आहेत. स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. तसेच राष्ट्रीय युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अधिक वाचा  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन