पुणे : पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी “पुणे फर्स्ट” (Pune) हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याच्या संकेतस्थळाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

पुणे महापालिकेचे (PMC) सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी यासह आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात पुणे राज्यासह देशात अग्रेसर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा पुण्याचा देशातील सर्वात मोठे शहर क्रमांक लागतो. पुण्याबद्दलची माहिती जगभर पोहोचविण्यासाठी ‘पुणे फर्स्ट’ या उपक्रमाची सुरवता केली आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीची कर्जतवर एकहाती सत्ता; राम शिंदेंना कात्रजचा घाट

पुण्याच्या विकासाचे आणि प्रगतीचे नवे मानदंड आपल्या शहराने स्थापन करावेत, गट- तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून “पुणे फर्स्ट” या विचाराने जनतेने चर्चा करावी, संवाद करावा, तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे यासाठी व्यासपीठाचा उपयोग होईल, असे गणेश बीडकर यांनी सांगितले. www.punefirst.org या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे.