बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आईला भेटायला आलेल्या प्रियकरावर कोयत्याने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयावह होता की, प्रियकर तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला आहे. या प्रकरणी आरोपी मुलावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

विवेक अर्जुन कोठुळे असं हल्ला झालेल्या 30 वर्षीय जखमी तरुणाचं नाव असून तो बीड तालुक्यातील वरवटी येथील रहिवासी आहेत. बीडमध्ये तो मजुरीकाम करतो. रविवारी सायंकाळी तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी प्रेयसीचा 16 वर्षीय मुलगा देखील घरी होता. आईच्या प्रियकराला पाहून आरोपी तरुणाला संताप अनावर झाला. यातूनच त्याचे आईच्या प्रियकरासोबत कडाक्याचं भांडण झालं.
यातूनच संबंधित तरुणाने आईच्या प्रियकरावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयावह होता की, विवेक घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्धावस्थेत पडला. या थरारक घटनेनंतर जखमी विवेकला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याठिकाणी डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा  आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी घर बांधून देण्याचा केला संकल्प

याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी कोयत्याने वार केल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.