भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांची नुकतीच भेट घेतली आहे. त्यांचे काही फोटो चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियाव व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी हे फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर यांची काल त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी समाधान या माझ्या कॉफीटेबल बुकची प्रत भेट दिली.‌ या भेटीत नानांसोबत अनेक विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्या. चंद्रकांत पाटील यांनी नाना पाटेकर यांना त्यांच समाधान हे पुस्तक भेट म्हणून दिलं आहे.

अधिक वाचा  एका आयटम नंबरसाठी तब्बल एवढे मानधन घेतात या अभिनेत्री

चंद्रकांत पाटील यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नाना पाटेकर लवकर राजकारणात येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, नाना पाटेकर भाजपात प्रवेश करणार की काय, मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी? दुसरा नेटकरी म्हणाला, नानासारख्या राष्ट्रवादी व्यक्तीची भाजपात खरी गरज आहे.