पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२१ या परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या परीक्षांसाठी अनुक्रमे १५ जानेवारी आणि १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.

एमपीएससीने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीकडून अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२१चा अर्ज भरण्यासाठी ११ जानेवारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२१चा अर्ज भरण्यासाठी १५ जानेवारीची मुदत दिली होती. मात्र आता अर्ज भरणे आणि चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील अटी आणि शर्तीमध्ये बदल नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अधिक वाचा  नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा; राज्यपालांना भाजपचे निवेदन