मुंबई : टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. स्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने हिंदी प्रेक्षकांनाही प्रभावित केले आहे. अल्लू अर्जुनच्या सुपर-डुपर हिट चित्रपटानंतर चाहत्यांच्या नजरा अभिनेत्याशी संबंधित प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लागले आहे. फक्त चित्रपटांमुळे नाही तर तो स्टायलिश लूकमुळे सतत चर्चेत राहतो.

अर्जुन रॉयल लाईफ जगतो. त्याच्या लुक एवढीचं स्टायलिश त्याची व्हॅनिटी व्हॅन आहे. अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन एका महालापेक्षा कमी नाही. अल्लू अर्जुनकडे सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे. हे फार लोकांना माहीत नसेल.

त्याच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 7 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनची एकूण किंमत सुमारे 3.5 कोटी रुपये आहे. पण व्हॅनला स्टायलिश बनवण्यासाठी अर्जुनने ऍक्सेसरीजवरही प्रचंड खर्च केला आहे. त्यामुळे व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  लोच्या झाला रे’चा भन्नाट टीझर रिलीज; प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिद्धार्थ व अंकुश

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक आलिशान मेकअप चेअर बसवण्यात आली आहे. जी अतिशय आरामदायी आहे. अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन जवळपास सर्व सोयींनी सुसज्ज अशी आहे.