छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. बिग बॉस चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. शो सुरु झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तरी आता हा शो अजुन दोन आठवडे आपले मनोरंजन करणार आहे. शो २ आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. सलमानने ही माहिती सर्व स्पर्धकांना दिली. यावेळी राखी सावंत तर आनंदीत झाली. पण इतर सदस्यांना हा मोठा धक्का होता. मात्र सगळ्यात जास्त नाराज शमिता शेट्टी झाली होती.

ही बातमी कळल्यानंतर राखीला आनंद झाला आणि ती मोठ्याने ओरडत तिचा आनंद व्यक्त करत होती. यावेळी शमिता राखीला शांत रहायला सांगते आणि बोलते बिग बॉसना त्यांची घोषणा पूर्ण करू दे. त्यानंतर शमिता निशांत भट्टसोबत या विषयी किचन एरियामध्ये बोलत असते. तेव्हा शमिता म्हणते, अभिजीत बिचुकले आणि राखी सावंतसारख्या लोकांसोबत ती या घरात एक दिवससुद्धा राहू शकतं नाही. अभिजित हा पुरुषी अहंकार बाळगणारा आहे. तर राखी नेहमी तिच्या खांद्याच्या दुखापतीवर विनोद करत असते.’

अधिक वाचा  “सगळ्यात हुशार राष्ट्रवादी पक्ष, मुख्यमंत्रीपद शिवसेनेला अन् फाईली”; चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

शमिता पुढे निशांतला विचारते, ती हा शो सोडून जाऊ शकते का आणि ती कोणत्याही गोष्टीत सहभागी होणार नाही. त्यानंतर राखी शमिताजवळ जाते आणि बोलते, तू मला तुझी बहिण का नाही समजतं आणि माझ्यासोबत गोष्टी का शेअर करत नाहीस. यावर शमिता बोलते, तिची प्रतिक आणि निशांतसोबत चांगली मैत्री आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा राखी अभिजीत बिचुकलेसोबत शमिताच्या खांद्यावर असलेल्या दुखापतीवर विनोद करते. राखी बोलते, फिनाले असेल आणि सुत्रसंचालक जेव्हा तिचा हात वर करेन तेव्हा तिचं दुखनं गायब होणार. दुसरीकडे अभिजीत म्हणाला, शमिता स्वत:ला असुरक्षित समजते कारण मी आता जिंकण्याच्या स्पर्धेत आहे.