गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्यानंतर मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले . ब्रीच कॅण्डीमधील आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आले असून उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती अशी माहिती मिळाली आहे.

न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्याशी संबंधित असणाऱ्या इतर समस्या आणि वय पाहता लता मंगेशकर यांना आयसीयूत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत.यापूर्वी लता मंगेशकर यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उषा मंगेशकर यांनी त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचे सांगितले होते.

अधिक वाचा  लैंगिक संबधांमुळे आरोग्य सुधारतं का? 10 सोप्या मुद्द्यात जाणून घ्या

महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासणार नाही. त्या आपल्या घरी विलगीकरणात किंवा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात थांबून उपचार घेऊ शकतात.

आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी तब्बल एक हजाराहून अधिक हिंदी गाणी गायली आहेत. याशिवाय मराठी आणि इतर भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केली आहेत. यश चोप्रा यांचा २००४ मध्ये आलेल्या ‘वीर-झारा’ चित्रपटात त्यांनी शेवटचं गाणे गायले होते. ३० मार्च २०२१ ला हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘सौगंध मुधे इस मिट्टी की’ हे गाणं भारतीय लष्कराला समर्पित करण्यात आले होते.

अधिक वाचा  कोथरूड क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागातर्फे "मतदान दिन" साजरा!

दरम्यान लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके याशिवाय राष्ट्रीय तसंच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.