पुणे : शिक्षक पात्रता परिक्षेतील गैरव्यवराहारमधील नव्या गोष्टी समोर येत आहेत. टीईटी परीक्षा घोटाळा पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाला होता.2018 च्या टीईटी परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी पाच कोटींचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शिक्षण भागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरिकरने पाच कोटी रुपये दिल्याचा दावा जीए सॉफ्टवेअर च्या अश्विनीकुमार याने केला आहे . पोलिसांच्या तपासात,आश्विन कुमार याने दिल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात दिली.

सावरीकरने 5 कोटी दिले
टीईटी 2018 च्या परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी अभिषेक सावरिकर ने पाच कोटी रुपये दिल्याचा दावा जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याने केला आहे .

अधिक वाचा  शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

आश्विन कुमारला बंगळुरुतून अटक
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केली आहे .या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहे . 2017 मध्ये आश्विन कुमार हा जीए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.

लखनऊमधून सौरभ तिवारीला अटक
टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे सायबर पोलिसांकडून सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणण्यात आले आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.