परभणी: रत्नाकर गुट्टे हे रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेली आहे . बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीने जप्त केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात दाखल आहे. सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक त्यांनी केल्याचं म्हटलं जातं आहे. यापूर्वी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आधीच जप्त केली आहे. ईडीने जप्तीची कारवाई आता पुन्हा सुरू केली आहे.

रत्नाकर गुट्टे ईडीच्या चौकशीला अनुपस्थित

गंगाखेड शुगर एन्ड एजन्सी मिलची सुमारे 100 एकर जमीन शेतकर्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गेल्या आठवड्यात ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. परळी – अंबेजोगाई रोडवरील वरवई गावातील ही पोल्ट्री त्यानंतर आता जप्त करण्यात आली आहे. पुन्हा एकदा आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित राहिले नाहीत.

अधिक वाचा  विलक्षण प्रेमकहाणी 'पांघरुण' ट्रेलर प्रदर्शित

प्रक्रियेनुसार मालमत्ता जप्त

मालमत्ता जप्त करण्याची ईडीची एक प्रक्रिया असते. आधी ईडी तपास करते. हा तपास दोन पातळ्यांवर असतो. एक म्हणजे मनी लाँडरिंगची रक्कम शोधणे आणि दुसरं म्हणजे त्या रकमेची मालमत्ता जप्त करणे. या प्रक्रियेनुसार ईडीने मालमत्ता जप्त केली. त्याची माहिती त्यानंतर कोर्टाला दिली. एखाद्या आरोपीची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची माहिती PMLA कायद्यानुसार कोर्टाला द्यावी लागते. कोर्ट त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करते . आणि त्यानंतर ईडी मालमत्ता आपल्या ताब्यात घेत असते. ही प्रक्रिया आता आमदार गुट्टे यांच्या मालमत्ते बाबत झाल्यानंतर त्यांची मालमत्ता ईडीच्या ताब्यात आली आहे

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

रत्नाकर गुट्टे यांना कोरोना संसर्ग

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना कोरोना ची लागण झाल्याचे समोर आलं आहे. कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येण्यापूर्वी ते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबतच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.