आळंदी  : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने आळंदी येथील कर्तव्य फौंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या झालेल्या रक्तदान शिबिरात १३१ सहभाग घेतला.

भोसरी येथील रेड प्लस ब्लड बँक यांच्या सहकार्याने साई मंगल कार्यालय येथे आयोजिलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योगपती शंकरराव येळवंडे यांनी केले. रक्तदान हे महादान असुन आजच्या युगात हे सर्वश्रेष्ठ दान मानले असे आता पर्यंत ३१ वेळा रक्तदान केलेले आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी सुद्धा सहभाग दर्शवून रक्तदान केले, यावेळी कर्तव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या रक्तदान शिबिराला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किरणशेठ येळवंडे, माजी नगरसेवक दिनेश घुले, बंडू नाना काळे, निसारभाई सय्यद यांनी सदिच्छा भेट दिली.

अधिक वाचा  पुणे येथील वादग्रस्त लवासा सिटी प्रकल्प घेणाऱ्यावर ईडीच्या धाडी