कोथरूड- बावधन प्रभागांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नगरसेवक किरण किरण दगडे पाटील यांचा वाढदिवस हा प्रभागातील सर्वसामान्य, उपेक्षित लोकांसाठी किरणोत्सव असून कायम आपल्यासाठी दिवस-रात्र धावपळ करणाऱ्या किरण दगडे पाटील यांचा वाढदिवस हा दलित आणि उपेक्षित लोकांसाठी किरणोत्सवाचा क्षणच.
कोथरूड भागात भागामध्ये प्रथमता नगरसेवक पदाची संधी मिळाल्या पासून सर्वसामान्य लोकांच्या आणि सुशिक्षित लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या आयुष्याला अर्पित केल्यानंतर या नेतृत्वाच्या पाठीमागे आज असंख्य मोठा जनसमुदाय उभा राहिला असून त्यांच्या दुवा आणि शुभेच्छा यांच्यावर संवाद आज कोथरूड बावधन भागातील हा किरणोत्सव दिवसभर बहरतच राहिल्याचे चित्र होते. नेत्तृत्व म्हटलं की आरोप-प्रत्यारोप हे कायमच होत राहतात…. पण यावरही मात करत आपल्या भागाचा विकास करण्याची कला ज्या लोकप्रतिनिधीला अवगत होते त्याच लोकप्रतिनिधी च्या पाठीमागे हा जनसागर आणि शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत असतो.
पुण्यातील पश्चिम द्वार कोथरूड बावधन सुतारवाडी आणि कोथरूड डेपो परिसर या भागातील पावलोपावली लावण्यात आलेल्या शुभेच्छांच्या फलकामुळे आणि त्यांच्या टिकेला सामोरे जावे लागलेल्या नेतृत्वाला आज शुभेच्छा देणे निमित्त लोटलेला जनसागर पाहिल्यानंतर नक्की जाणवतं की हा किरणोत्सव आहे केलेल्या कामाच्या पावतीचा. सध्या पुणे महानगरपालिकेत निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण जरा जास्त झाले असले तरी संयम न ढाळता आपल्या हितचिंतकांच्या प्रेमाला योग्य न्याय देण्यासाठीच किरण दगडे पाटील यांनी सर्वांच्याच शुभेच्छा स्वीकृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
नेतृत्व उदयाला येत असेल तर त्यात असलेल्या कालागुणांमुळे दिवसेंदिवस प्रगती होत विविध पदे पादक्रांत होतच जातात. सुरुवातीला पुणे महापालिकेवर नगरसेवकपदी नियुक्ती झाल्यानंतर बीडीपी समितीवर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली. या समितीवर ती काम करताना आपल्या कार्याचा ठसा उमटवत पुणे शहरातील जैवविविधता आणि त्याचं सामर्थ्य याची पुस्तिका प्रकाशित करून त्यांनी पुणे शहरातील जैविक समृद्धी आणि संपन्नता याचे सामान्य लोकांना दर्शन केले. त्यानंतर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा या तरुणांच्या संघटन कार्यासाठी जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पुणे जिल्हा हे पद घेऊन आजही युवा मोर्चाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्ह्यातील संघटन कौशल्य आणि जनसंपर्क याची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी मानाची समजली जाणारी जिल्हा नियोजन समिती वर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली.
आरोप आणि प्रत्यारोप होतच राहणार पण जन्मदिवस हा खास असतो म्हणूनच…. श्री. किरणदादा दगडे पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!