वारजे : भारतीय जनता पक्ष नावाला मोठा पक्ष असला तरी प्रत्यक्षात त्यांना जनसामान्यांसाठी प्रभावी काम करता आले नाही. मोदींचं नाव घेणं हेच त्यांचं केवळ काम आहे. वारजे माळवाडीतील सोयीसुविधा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही नगरसेवक कटिबद्ध असून सर्वांचेच काम प्रशंसनीय आहे ,बाबा धुमाळ, सचिन दोडके, दिलीप बराटे, सर्वात तरुण नगरसेविका सायली वांजळे यांनी ही प्रशंसनीय काम केले असून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कामाला दाद द्यावी असे आव्हान जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वारजे येथील कार्यक्रमात केले. विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेच्या वतीने वारजे माळवाडी येथील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात सुरू करण्यात येत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डायलिसिस सेंटर व सोनोग्राफी, एक्सरे सेंटरचे लोकार्पण आज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे या व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका दिपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, लक्ष्मी दुधाने, माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, सुरेश गुजर, शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, त्रिंबक मोकाशी आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  भारतीयांसाठी येतोय दमदार स्वदेशी पर्याय Micromax In Note 2 उद्या होणार लाँच

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही नगरसेवकांनी क्रीडासंकुल, रुग्णालय व अत्यावश्यक उद्याने, 24 X70तास पाणी वन उद्यान, क्रीडांगणे,क्रीडा संकुल, गरजा पूर्ण करताना वारजे परिसराचा कायापालट केला आहे. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या सारखे नेतृत्व या परिसराला लाभले आहे. सामान्य नागरिकांसाठी डायलिसिस सेंटर व सोनोग्राफी, एक्सरे सेंटर सारखी सुविधा उपलब्ध करून देऊन विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी आरोग्याच्या बाबतीत महत्वपूर्ण काम केले आहे. विरोधी पक्षात असूनही चांगले काम करता हे त्यांनी दाखवून दिले आहे. मागील पाच वर्षातील शहरातील भाजपचे काम पाहून आगामी निवडणुकीत मतदार नक्कीच राष्ट्रवादीला निवडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  सलमानचं नवं गाणं रिलीज, एका तासात 1 मिलीयन व्हूज

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डायलेसीस सेंटर, एक्सरे व सोनोग्राफीची सुविधा चालू व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने समाधान वाटत आहे. वारजे माळवाडी परिसरात विकासाची कामे करताना चारही नगरसेवकांनी एकत्र परिसराचा कायापालट केला आहे असे दिपाली धुमाळ म्हणाल्या.

बाबा धुमाळ म्हणाले, या सुरू करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डायलिसिस सेंटर मध्ये दहा डायलेसीस बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वारजे कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, कोंढवा कोपरे -धावडे तसेच कोथरूड व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय नियमानुसार अतिशय कमी शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एक्सरे व सोनोग्राफी ची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच महानगरपालिकेच्या माध्यमातून सिटी स्कॅन मशिनची व्यवस्था देखील येथे केली जाणार आहे.

अधिक वाचा  हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी 5 फेब्रुवारीला सुनावणी

खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार नगरसेविका सायली वांजळे यांनी व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. या अत्याधुनिक सुविधेमुळे पुणे शहराच्या आरोग्यसेवेत मोलाची भर पडली,याबद्दल दिपालीताई धुमाळ, बाबा धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप , ज्येष्ठ नगरसेवक दिलीपभाऊ बराटे, नगरसेवक सचिन दोडके, लक्ष्मी दुधाणे,सायली वांजळे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला (ग्रामीण) मतदारसंघ अध्यक्ष त्रिंबकआण्णा मोकाशी, सुरेशआण्णा गुजर आदी उपस्थित होते.