एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राज्यभरातील प्रवासी या संपामुळे प्रभावित झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचे वर्णन न केलेले बरे असे शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. त्यातच ओमायक्रॉन नावाचा करोनाचा नवीन अवतार आल्याने देशावर आणि राज्यावर संकट आले आहे.राज्यातील अर्थकारणावर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत आहे. त्यामुळे राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत द्यावी लागत आहे. असे, पवार म्हणाले.

कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्न आहेत, कृती समितीने त्यातील काही प्रश्न सरकारच्या नजरेत आणून दिले आहेत.सकारात्मक निर्णय घेण्याचे त्याप्रकरणी सरकारचे प्रयत्न असतील, असे राज्य सरकारने सांगितले आहे. एसटी त्यानंतर चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर आले पाहिजे, असे पवार म्हणाले. सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तुमच्या इतर प्रश्नांवरही विचार करेल अशी ग्वाही यावेळी पवारांनी दिली.

अधिक वाचा  आता वाहन खरेदी आणि हस्तांतरण बाबत नागरिकांना मोठा दिलासा

कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचे हित आणि एसटी टिकली पाहिजे याबाबत उल्लेख आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केले आहे .ही आनंदाची बाब असल्याचचे पवार म्हणाले. कामगारांच्या समस्या आम्ही मनावर घेणार नाही, असा काही लोकांनी समज पसरवला होता, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी होती. हा संप सोडवायला त्यामुळे दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच हा संप सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत असे शरद पवार यांनी सांगितले

अधिक वाचा  एसटीमहामंडळ 'चालक'आणि वाहक म्हणून करणार यांचा वापर

“सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील.” असे आवाहन शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे . तर एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे पवार म्हणाले.