अभिनेता प्रसाद ओकला मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जाते. अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारा प्रसाद ओक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात या माध्यमातून राहण्याचा प्रयत्न करत असतो. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणून प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक हे ओळखले जातात. प्रसाद ओक याने नुकतीच पत्नी मंजिरीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. नुकतीच लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर करत त्याने तिला एक खास गिफ्टही दिले आहे.

७ जानेवारी १९९८ रोजी प्रसाद ओक आणि मंजिरी हे दोघेही विवाहबंधनात अडकले. या दोघांनी लव्ह मॅरेज केले आहे. त्या दोघांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाले आहेत.त्याने त्या निमित्ताने मंजिरीला एक अनोखे गिफ्ट दिले आहे. त्याने याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने तीन पोस्ट शेअर केल्या आहेत.

अधिक वाचा  पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल

आमचे लग्न 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे . एवढ्या मोट्ठ्या काळात आयुष्याचे अनेक चढउतार पाहिले. अनेक सुख दुःखाचे क्षण अनुभवले. अनेक माणसे , अनेक नाती जोडली… तुटली सुद्धा… या सगळ्यात अविरत राहिली, ती फक्त तुझी सोबत…तुझी साथ…आणि तुझे प्रेम…!!! माझे शब्द संपले म्हणून एवढेच म्हणतो. ना अजून झालो मोठ्ठा, ना स्वतंत्र अजुनी झालो, तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो …, असे प्रसाद ओक म्हणाला.

एकमेकांना गेली 24 वर्षं अनेक GIFTS दिल्यानंतर… या वर्षी काय GIFT द्यायचे ??? दोघांनाही सुचत नव्हते … मग अचानक काही माणसे भेटली… काही छान घडले आणि मग ठरले काय GIFT द्यायचे एकमेकांना. हेच ते GIFT… प्रेमाची भेट, असे प्रसाद ओक म्हणाला. यानंतर प्रसाद ओकने एक व्हिडीओ शेअर केला आहे.५ मिनिटे १५ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. यात त्या दोघांनीही छान रोमँटिक व्हिडीओ शूट केला आहे. आतापर्यंत प्री वेडींगचे बरेच व्हिडीओ आपण पाहिले. पण पोस्ट वेडींगचा हा आमच्या माहितीनुसारचा पहिला व्हिडीओ, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मंजू, असे प्रसाद ओक म्हणाला. सध्या प्रसाद ओकची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.