करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री यांना गेल्या काही दिवसांपासून करोनाची लागण झाली आहे. नुकतीच सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या प्रचंड सक्रीय असतात. त्या नेहमी विविध पोस्ट टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकंतीच फेसबुकवर तृप्ती देसाई यांनी पोस्ट शेअर करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अखेर “कोरोनाने” मला गाठलचं- #माझीटेस्ट #पॉझिटिव्ह आली_आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा  गर्भवतींनी कोरोना लस कधी घ्यावी? 'कोव्हॅक्सिन' सुरक्षित, तज्ज्ञांचा दावा

त्यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते….जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे, काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा, असेही आवाहन तृप्ती देसाई यांनी केले आहे.

दरम्यान बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वाच्या तृप्ती देसाई या स्पर्धक होत्या. घरात काही आठवडे राहिल्यानंतर त्या एलिमिनेट झाल्या. तब्बल ५० दिवस तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात होत्या. यानंतर महेश मांजेरकरांनी ५० दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला. त्यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, ५० दिवस हा फार मोठा प्रवास आहे. पण बिग बॉसच्या घराबद्दल बरेच गैरसमज आहेत. मात्र बिग बॉसचे घर हे फार छान आहे. मी सर्वांची मने जिंकली हे सर्वात मोठं आहे. मी सामाजिक कार्य करते, मी आधी हे लोकांना सांगत होते. पण आता लवकरच मी राजकारणात प्रवेश करणार आहे ,असे तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितले.