नवी दिल्ली,10 जानेवारी: गेल्या काहीदिवसांपासून बॉलीवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त लाईमलाइटपासून दूर आहे. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते त्याची वाट पाहत असतात.
पण बरेच दिवस झाले तो मोठ्या पडद्यावर दिसला नव्हता पण आता ही चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्याने स्वतःच याचा खुलासा केला आहे. यंदाच्या वर्षी त्याचे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. एका मुलाखतीमध्ये संजय दत्तने याबाबत माहिती दिली आहे.

संजय दत्त पानीपत या चित्रपटामध्ये अखेरचा पाहायाल मिळाला होता. 2019 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात त्याने अहमद शाह अब्दाली ची भूमिका निभावली होती. एका मुलाखतीमध्ये संजय दत्तने वाढत्या कोरोना

अधिक वाचा  प्रजासत्ताक दिनानिमित्त मातीचे मैदान व क्रीडा संकुलचे भूमिपूजन

प्रार्दुभावावर भाष्य केले आहे. त्याने चिंता व्यक्त करत काळजी घ्या असे आवाहन केले आहे.

तसेच त्याने, त्याच्या आगामी चित्रपटाविषयीदेखील माहिती दिली. ‘शमशेरा’, ‘केजीएफ2’आणि ‘पृथ्वीराज’ हे चित्रपट यंदाच्या वर्षी लवकरच रिलीज होणार आहेत. या तीन चित्रपटांसाठी मी खूप उत्साही आहे पण कोरोनामुळे हे चित्रपट रिलीज होण्यामध्ये अडचणी येत आहेत. तसेच हे चित्रपट मोठ्या पडद्यावरच रिलीज होणार आहेत.

फक्त कोरोनास्थिती नियंत्रणात यायला हवी. अशी भावना संजय दत्तने यावेळी व्यक्त केली. मागील दोन वर्षात ‘सड़क 2’, ‘तोरबाज’ और ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हे तीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्याने त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मचे आभार मानले. पण हे चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज आणखी मस्त वाटले असते.

अधिक वाचा  आबांचा मुलगाही पॉवरफुल ,कवठे महाकाळ ताब्यात

संजय दत्त पुढे म्हणतो, “मोठ्या पडद्याचे आकर्षण असते आणि त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाचा पुरेपूर आनंद घेण्याची संधी मिळते, परंतु इंडस्ट्रीत वेगाने बदल होत आहेत हे नाकारता येणार नाही.” ओटीटी वर प्रत्येक प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडीचे चित्रपट आहेत. मला वाटतं थिएटर्स आणि ओटीटी या दोन्हींचं महत्त्व आहे. कोणाला कोणापासून धोका नाही. असे मत संजय दत्तने यावेळी व्यक्त केले.