पुणे: ट्रस्टचे वादविरहित बदल अहवाल निकाली काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी मोहिमेत पुणे विभागाने चार हजार १२० प्रकरणे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित होती. मुंबई विभागातील १५ हजार ३४८ प्रकरणांपैकी २ हजार ९०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

धर्मादाय संस्थांमध्ये विश्वस्त बदलात त्याची नोंद करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे अहवाल दाखल करावा लागतो. बदल अहवालांना हरकत नसेल तर ते वादरहित बदल अहवाल समजले जातात. राज्यातील आठ विभागांत ५० हजार बदल अहवाल प्रलंबित होते. राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी ट्रस्टचे वादविरहित बदल अहवाल निकाली काढण्यास १३ ते ३० डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते.

अधिक वाचा  पुणे फर्स्ट" चा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ

पुणे विभागात नऊ हजार ११ प्रकरणे प्रलंबित असताना जवळपास ५० टक्के बदल अहवाल निकाली काढण्यात आले. या मोहिमेत राज्यातील आठ विभागांत पुणे विभागाने चार हजार १२० प्रकरणे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे विभागात अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे शहर तसेच जिल्ह्याचा समावेश होतो. पुणे विभागातील बदल अहवाल निकाली काढण्यासाठी सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय उपायुक्त राहुल मामु, सहायक आयुक्त अमरदीप तिडके, राहुल चव्हाण, राणी मुक्कावार, प्रशांत चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. सहायक आयुक्त राहुल चव्हाण यांनी सर्वाधिक बदल अहवाल निकाली काढले.

अधिक वाचा  शाळा कधी सुरू होणार? राजेश टोपेंनी दिले संकेत

विशेष मोहिमेअंतर्गत प्रलंबित असलेले पण वादग्रस्त नसलेले बदल अहवाल निकाली काढण्याबाबत पुण्यातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वकिलांनी सकारात्मक भूमिका घेऊन पक्षकारांचे प्रबोधन केले. त्यामुळे ज्या विश्वस्त संस्थांचे विनावाद बदल अहवाल प्रलंबित होते, त्यांच्या विश्वस्तांनी तातडीने कागदोपत्रांची पूर्तता करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. अधिकाऱ्यांनी कार्यपद्धती सुलभ केल्याने पुणे विभाग अव्वल ठरला, असे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज प्र. कदम जहागीरदार यांनी सांगितले.

विभागनिहाय निकाली

निघालेली बदल अहवाल प्रकरणे

विभाग               प्रलंबित प्रकरण        एकूण निकाली प्रकरणे

अधिक वाचा  कर्वेनगर DP रस्ता मधोमध रेडिमिक्स प्लान्ट; अपघाताचे प्रमाण वाढले

बृहन्मुंबई                   १५ हजार ३४८         २ हजार ९०८

नाशिक              ४ हजार ४०१          १३०४

पुणे                ९ हजार ११            ४ हजार १२०

कोल्हापूर             ४ हजार ४१९          १ हजार ९२४

अैारंगाबाद           ५ हजार ७४१          १ हजार ४०७

लातूर                १ हजार ४२०          ९२७

अमरावती             २ हजार ३११          १ हजार २८१

नागपूर               ४ हजार ३२३          ८३०

एकूण                ४६ हजार ९८४         १४ हजार ७६४