मुंबई : कोरोना व ओमीक्रोन महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने काही कडक निर्बंध लागू केल्याने सध्या सर्वसामान्य जनतेला मॉल, थिएटर, रेल्वेप्रवास इत्यादी करता वॅक्सिनेशनच्या दोन डोसेसचे सर्टिफिकेट बंधनकारक केले आहे, परंतु आजही लोकांमध्ये लसीकरणाबाबत हवी तशी जागरूकता म्हणा किंवा पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोस करता २८/८४ दिवस थांबण्याची सहनशीलता नसल्याने सेकारन फ्रान्सिस नाडर सारख्या बनावटकारांचा सुळसुळाट झाला आहे.

धारावीस्थित सेकारन फ्रान्सिस नाडर (३६) हा आरोपी सायबर कॅफे चालवत असून कॉम्प्युटराईज डिझाइनींग मध्ये त्याचा हात बसला असल्या कारणाने त्याने आपल्या सायबर मधूनच वॅक्सिनेशन सर्टिफिकेट बनवून एक हजारात विकण्याचा गोरखधंदा सुरू केला. एकीकडे सरकार कोरोना आणि ओमीक्रोनच्या लाटेला थोपवण्याकरता अथक मेहनत करत असताना सेकारन फ्रान्सिस नाडर सारखे गुन्हेगार व स्वतःच्या फायद्यासाठी अश्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारे आपल्यातीलच काही आजागरुक नागरिक सरकारच्या मेहनतीवर पाणी ओतण्याचे काम करीत आहेत.

अधिक वाचा  सरस्वती विद्या मंदिर माजी विद्यार्थी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा संपन्न

पोलीसांना सेकारन फ्रान्सिस नाडरच्या कुकृत्याचा सुगावा लागताच त्यानी त्वरित सापळा रचला व एक बनावट ग्राहक तयार करून त्याला नाडरकडे पाठवण्यात आले, बनावट प्रमाणपत्र व्यवहार ठरला, पैसे ही दिले व प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते घेण्यासाठी झालेल्या भेटीत पोलिसांनी सेकारन फ्रान्सिस नाडर रंगेहाथ अटक केली.

पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून त्याने आतापर्यंत कुणा कुणाला प्रमाणपत्र वाटप केले, याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी माध्यमांना दिली आहे.