सर्वस्पर्शी फाउंडेशन यांच्या वतीने रमेश उभे यांना उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्कार पुणे महानगरपालिका येथे सुनिता वाडेकर उपमहापौर यांच्या शुभहस्ते स्मुतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पुणे महानगरपालिका येथे सर्वस्पर्शी फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय सर्वस्पर्शी गुणगौरव पुरस्कार 2022 याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, व्यवसायिक, पोलीस, इत्यादी विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा सन्मानित व्यक्तींचा आदरणीय पुणे महापौर मुरलीधर मोहोळ व सौ सुनिता वाडेकर उपमहापौर यांच्या शुभहस्ते या सर्व व्यक्तींना सन्मानित करून त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अधिक वाचा  वॉर्ड पुर्नरचनेचा अहवाल आज आयोगाकडे सादर होण्याची शक्यता

पुरस्काराचे सर्वस्पर्शी फाउंडेशन या संस्थाचे मुख्य अध्यक्ष व आयोजक डॉ राजू पोखर्णीकर फिरोज खान, विक्रांत पवार यांनी केले होते. यावेळी सूत्रसंचालन संस्था चे उपाध्यक्ष प्रा. महादेव रोकडे आणि मनोज सोनवणे यांनी केले.