सुतारदरा ११ मधील सर्वे नं – ११२, गल्ली नंबर १९, शिवसाई नगर , विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, सुतारदरा. येथील भागात गेली सहा महिन्यापासून चाळीत ड्रेनेजचे पाणी साचत आहे. महापालिकेच्या कोथरूडमधील ऑफिस मध्ये वार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मनसेचे शाखा अध्यक्ष किरण उभे यांनी पुणे महापालिका आयुक्त सचिन तामखेडे यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे सदर भागात अत्यंत दुर्गंधी अणि रोगराई पसरली आहे.तरी आपन दोन दिवसात संबंधीत ड्रेनेज लाईन ची दुरुस्ती करून तेथे साठलेल्या सांडपाण्याचा योग्य तो निचरा करून द्यावा, याने सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी तिथून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नः निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  यंदा परिवर्तन अटळ; राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार! गोव्यातही महाविकास आघाडीचे संकेत